रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राम मंदिर अयोध्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (17:46 IST)

मुंबईच्या कांबळे दाम्पत्याला पंतप्रधान मोदी यांच्यासह राम पूजेचा मान

Ram Pran Pratishtha : 22 जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रामलल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत. 
 
देशभरातील 11 जोडप्याना ही संधी मिळाली असून यात कांबळे दाम्पत्य देखील आहेत. कांबळे दाम्पत्य नवी मुंबईतील खारघर येथे वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे कांबळे कुटुंबियांना मंदिराच्या गर्भगृहात पूजा करण्याचा मान मिळणार आहे. त्यांना राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण 3 जानेवारी रोजी मिळाले असून ते 20 जानेवारी मुंबईतून आयोध्येकडे रवाना होणार आहेत. या सोहळ्यासाठी जगभरातील जवळपास सहा हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
विठ्ठल कांबळे हे आरएसएसचे स्वंयसेवक आहे. ते कारसेवकही होते. 1992 च्या राम मंदिर आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. सोहळ्यासाठी निमंत्रणाने कांबळे परिवार आनंदी आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या दाम्पत्यांना 15 जानेवारीपासून नियमांचं पालन करावं लागणार आहे. या दाम्पत्यांना कडक 45 नियमांचं पालन करावं लागणार आहे. यात वस्त्र परिधान ते जेवणापर्यंतच्या नियमांचा सामावेश आहे.  नियम पालन केल्यानंतर 22 जानेवारीला राम मंदिरात रामललाच्या प्राणाचा अभिषेक होईल, त्यानंतरच जोडप्यांचा संकल्प आणि विधीही पूर्ण होतील.