रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राम मंदिर अयोध्या
Written By
Last Modified: बुधवार, 24 जानेवारी 2024 (16:49 IST)

संपूर्ण मंत्रिमंडळासह शिंदे-फडणवीस 'या' तारखेला जाणार अयोध्या

अयोध्यामध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली असून आता महाराष्ट्राचे सीएम एकनाथ शिंदे आणि डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळासह फेब्रवारीच्या पहिल्या आठवड्यात ते राम मंदिरात दर्शनसाठी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री अयोध्या जाऊन दर्शन घेतील. महाराष्ट्र कॅबिनेट 5 फेब्रवारी रोजी रामललाचे दर्शन घेणार आहे. यावेळी संपूर्ण मंत्रिमंडळही दर्शन करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
 
22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी राज्यातून कोणी उपस्थित नव्हते मात्र आता अयोध्या दौऱ्याचा प्लॅन भाजपने तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स अकांऊटवरुन दिली होती.