1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. अयोध्या विशेष
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (19:57 IST)

अंतरंग म्हणजे "राम"

shri ram
अंतरंग म्हणजे "राम"
श्वास-उश्वास आहे "राम"
जपते मन निरंतर "राम"
दिसतो डोळ्यास मम "राम"
सखा सोबती माझा "राम"
घरात राहतो माझ्या सवें "राम"
आत्मसम्मान सदा असे "राम"
जीवनाची वाटचाल "राम"
उद्देश अंतिम असें "राम"
संकट हरोनी घेतो "राम"
वाट दाखवी सत्याची"राम"
रामा विन नच जीवनात"राम"
असाच असू दे, नाद माझा "राम"
जगणे नकोच, शिवाय"राम"
मरण ही नसावे, तुज वीन "राम"
प्रेरणा व्हावी, तू हे "राम "
वाट दाखवून, ने सवें तव "श्री राम"! 
 ।।श्री राम जय राम जय जय राम ।।
..... अश्विनी थत्ते.