Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 30 सप्टेंबर 2010 (17:18 IST)
‘जागा तत्काळ मिळणार नाही’
अयोध्येतील वादग्रस्त जागी राम जम्मभूमी असल्याचा निकाल आज न्यायालयाने दिला असून, ही जागा तत्काळ विजेत्या पक्षाला मिळणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले जाण्याचा अधिकार असल्याने न्यायालयाने ही जागा तत्काळ दिली जाणार नसल्याचे म्हटले आहे.
वादग्रस्त जागा ही रामजन्मभूमीचीच असल्याचे न्यायालयाने म्हटले असून, यातील वाटा हा निर्मोही आखाडा व हिंदू महासभेला देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.