बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By
Last Modified: सोमवार, 12 एप्रिल 2021 (13:01 IST)

बाबासाहेबांच्या जीवनातील 3 प्रेरक प्रसंग

संस्कृत भाषेचं ज्ञान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र भारताची नवीन राज्यघटना तयार करण्याबाबत घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपदी नियुक्त केले गेले.
 
अनुसूचित भाषांची यादी तयार करण्याची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांनाही त्यातील सर्व भाषांची माता संस्कृत असे द्यायची फार इच्छा होती पण काही सदस्यांच्या विरोधामुळे हे शक्य झाले नाही. पण त्या काळात श्री लाल बहादूर शास्त्री आणि आंबेडकर ह्यांच्यात संस्कृत भाषे संदर्भात चर्चा झाली. त्या वेळी विरोधकांच्या लक्षात आले की दोन महान व्यक्ती संस्कृतभाषेत संभाषण करीत आहेत.
 
शास्त्रीजींना संस्कृत भाषेचे ज्ञान असणे अपेक्षित होते, परंतु अशिक्षित दलित कुटुंबात जन्मलेल्या बाबासाहेबांचा संस्कृत भाषेवर प्रभुत्व असेल हे कोणालाही अपेक्षित नव्हते. ह्या मुळे ही माहिती लवकरच पसरली. त्या दिवसापासून सर्व आंबेडकरांच्या ज्ञानावर विश्वास ठेवू लागले.
 
************

शिपाई नाही तर पाणी नाही
अस्पृश्य मानल्या जाणार्‍या महार जातीचे बाबासाहेब होते. हेच कारण होते की त्यांना शाळेत इतर विद्यार्थ्यांसह बसणे शक्य नव्हते आणि त्यांना वर्गाच्या बाहेरच बसून अभ्यास करावा लागायचा.
 
या शिवाय त्यांना त्या शाळेच्या नळालाही स्पर्श करण्याची परवानगी नव्हती, पण इतर विद्यार्थ्यांना असे कुठलेही बंधन नव्हते. ते पाहिजे तेव्हा पाणी पिऊ शकत होते.
 
त्यांना पाणी तेव्हाच मिळू शकते ज्या वेळी तिथला शिपाई त्यांना नळ सुरु करून देत असत. तो नसल्यावर अजून कोणते ही इतर विध्यार्थी त्यांना नळ सुरु करून देत नव्हते. या परिस्थितीचा सारांश त्यांने आपल्या एका लेखात पण नमूद केला आहे.
 
" शिपाई नाही पाणी नाही।"
 
***********
 
बाबासाहेब आणि ग्रंथपाल
डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप त्रास सहन केले पण त्याचा परिणाम त्यांनी कधीही आपल्या शिक्षणावर होऊ दिला नाही. ते दररोज १४ ते १८ तास अभ्यास सहजच करत असे. बडोद्याचे शाहू महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. शिक्षण आणि कठोर परिश्रमाच्या त्यांच्या आग्रहाखातर.
 
* बाबासाहेबांना पुस्तके वाचण्याची फार आवड होती. असे आख्यादित आहे की त्यांची वैयक्तिक लायब्ररी जगातील सर्वात मोठी लायब्ररी होती आणि त्यात पुस्तकांची संख्या ५० हजारांपेक्षा देखील अधिक होती.
 
लंडन येथे वास्तव्याच्या वेळी ते दररोज एका लायब्ररीत जात असे आणि तासंतास अभ्यास करत असे. एकदा ते दुपारच्या जेवणाच्या वेळी लायब्ररीत बसून भाकरी खात होते तेव्हा ग्रंथपालाने त्यांना बघितले आणि त्यांना चिडवले आणि टोमणा दिला की कॅफेटेरिया जाण्याऐवजी ते येथे लपून- छपून भोजन करत आहे. ग्रंथपालाने त्यांना शिक्षा करण्याची व त्याचे सदस्यत्व संपविण्याची धमकी दिली. ते ऐकून बाबासाहेबांनी त्यांची माफी मागितली आणि स्वतःच्या आणि आपल्या समाजाच्या संघर्ष आणि इंग्लंडमध्ये येण्याचे कारण सांगितले. तसेच दुपारच्या जेवणासाठी कॅफेटेरिया जाण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्याची प्रामाणिक कबुलीही त्याने दिली. हे ऐकल्यावर ग्रंथपाल म्हणाला-
" आजपासून आपण दुपारच्या जेवण्याच्या वेळी येथे न बसता माझ्यासोबतच कॅफेटेरियात येणार आणि मी माझे भोजन तुमच्याबरोबर वाटून खाणार.
* ग्रंथपाल एक ज्यू (यहुदी) होता आणि त्याचा या वागणुकीमुळे बाबासाहेबांच्या मनात यहुदींसाठी एक विशेष स्थान होते.