शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 6 मे 2019 (10:37 IST)

रेल्वे उशिरा पोहोचल्याने 400 विद्यार्थ्यांची चुकली परीक्षा

कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्यातील सुमारे 400 विद्यार्थ्यांना ट्रेन उशिरा पोहोचल्याने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET)ला मुकावं लागलं.
 
म्हैसूरमार्गे हंपी ते बंगळुरू अशी चालवली जाणारी हंपी एक्स्प्रेस रविवारी सकाळी 7 वाजता बंगळुरूत पोहोचणे आवश्यक होते.
 
या विद्यार्थ्यांची परीक्षा दुपारी 2 वाजता होती, मात्र ट्रेनला 7 तासांपेक्षा जास्त उशीर झाला आणि दुपारी 2 वाजून 36 मिनिटांनी ही ट्रेन बंगळुरूला पोहोचली. या घटनेमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी ट्वीट करून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवल्या.
 
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे एक ट्वीटही केले आहे. "तुम्ही तुमच्या यशाबाबत स्वतःची पाठ थोपटून घेता, मग सहकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेची जबाबदारी घेणार का?" असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.