बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 28 जून 2021 (18:47 IST)

असदुद्दीन ओवेसींचा MIM पक्ष यूपीत लढवणार 100 जागा

खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा MIM पक्ष उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत 100 जागा लढवणार आहे.ओवेसी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली. 
 
MIM ने यूपी निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रियाही सुरू केल्याची माहिती ओवेसेंनी दिली.
 
उत्तर प्रदेशच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते ओम प्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीप्रणित भागिदारी संकल्प मोर्चासोबत MIM युती करणार आहे.
 
MIM उत्तर प्रदेशात कुणासोबत जाणार,याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते.त्यातून निर्माण होणाऱ्या अफवांना थांबवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओवेसींनी यूपी निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
 
दुसरीकडे,माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या प्रमुख मायावती यांनीही यूपी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केलीय.