गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मे 2020 (20:53 IST)

बीबीसीने भारतात सुरू केले अत्यावश्यक नवीन पॉडकास्ट

बीबीसीने भारतातील हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनेक नवीन पॉडकास्ट आणि विशेष डिजीटल कार्यक्रम सुरू केले आहेत ज्याने प्रेक्षकांसाठी Covid-19 वर आवश्यक माहिती पुरविली जाणार आहे. हे पॉडकास्ट आणि विशेष प्रोग्राम संपूर्ण भारतभरातील डिजीटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
 
BBC ने भारतातील श्रोत्यांसाठी Covid-19 वर सूचना प्रदान करण्यासाठी नवीन पॉडकास्ट आणि विशेष डिजीटल प्रोग्राम सुरू केले आहेत. हे पॉडकास्ट आणि विशेष प्रोग्राम संपूर्ण भारतभरातील डिजीटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
 
बीबीसीच्या भारतीय भाषा प्रमुख रुपा झा यांनी सांगितले की ‘’साथीच्या रोगाच्या या काळात विश्वसनीय आणि खरं बातम्यांची मागणी आहे. म्हणूनच आम्ही हे सुनिश्चित करू इच्छित होतो की आमच्या प्रेक्षकांपर्यंत संदर्भ आणि स्पष्टीकरणासह अचूक माहिती पोहोचावी.
 
दुनिया जहां: बीबीसी हिंदीचे साप्ताहिक पॉडकास्ट जागतिक मुद्द्यांच्या सखोल विश्लेषणासह ट्रेड आणि चालू घडामोडी अन्वेषण करण्यासाठी शीर्षकांच्या पलीकडे आहे. यात फॅक्ट चॅकचा समावेश आहे. हे पॉडकास्ट BBC Hindi, Apple Podcasts, Gaana, Jio Saavn, Saregama Carvaan या प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम किंवा डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
 
BBC मिनिट हिंदी कोरोना व्हायरस विशेष: BBC हिंदी बुलेटिन आरोग्य, तंत्रज्ञान, जीवनशैली, विज्ञान यावर सर्व आवश्यक सूचना केवळ 60 सेकंदात प्रस्तुत केलं जातंय. हे विशेष बुलेटिन सोमवार ते शुक्रवार दर तासाला FM पार्टनर्सद्वारा 24 भारतीय शहरांमध्ये सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध आहे.
 
FM तडका, रेडिओ मिस्टी, 94.3, टोमॅटो FM आणि रेडिओ धूम 104.8 FM. आणि FM मिस्टी 24 शहरांमध्ये ज्यात जम्मू आणि श्रीनगर शहरांचा देखील समावेश आहे.  
कोरोना दिनभर: BBC हिंदी फेसबुक लाइव्हवर भारत आणि जगभरातील Covid-19 संबंधित दररोजचे अपडेट्स मिळू शकतील. हे सोमवार ते शुक्रवार बीबीसी फेसबुक आणि यूट्यूब बीबीसी हिंदी दिनभरवर साडेसात वाजता वर उपलब्ध असेल. 
 
BBC मिनिट कोरोनाव्हायरस विशेष: BBC World Service तरुणांसाठी इंग्रजीमध्ये 60 सेकंदाचा राउंडअप प्रस्तुत करत आहे. हे प्रत्येक अर्धा तासात प्रस्तुत केल्या जातील. यात कोरोनाव्हायरसवर दिवसातून दोनदा पॉडकास्ट, सर्व 60 सेकंदात, स्ट्रीम किंवा डाउनलोडसाठी बीबीसी मिनिट कोरोनाव्हायरस विशेष, अॅपल पॉडकास्ट, गाना, जिओ सावन, र्स्पोटिफॉय, सारेगामा कारवां यावर उपलब्ध आहे.
 
BBC कोरोनाव्हायरस ग्लोबल अपडेट्स: कोरोना संसर्गाबद्दल लेटेस्ट अपडेट्स जसे कोणत्या भागात याचा प्रार्दुभाव वाढत आहे, यासाठी मेडिकल माहिती आणि आरोग्यावर तसेच व्यवसाय, खेळ आणि प्रवासावर होणारे परिणाम या सर्वांबद्दलची माहितीसाठी दररोज 5 मिनिटाचं राउंडअप स्ट्रीम किंवा डाउनलोड करण्यासाठी BBC कोरोनाव्हायरस ग्लोबल अपडेट, अॅपल पॉडकास्ट, गाना, जिओ सावन, र्स्पोटिफॉय, सारेगामा कारवां यावर उपलब्ध आहे.