शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 30 नोव्हेंबर 2019 (09:43 IST)

एक लीटर दुधात बादलीभर पाणी, मध्यान्न भोजन म्हणून 81 मुलांना वाटप

उत्तर प्रदेशमध्ये मध्यान्न भोजनांतर्गत एक लीटर दुधात बादलीभर पाणी टाकून 81 मुलांना वाटप करण्यात आलं.  
 
सोनभद्र जिल्ह्याच्या चोपन ब्लॉक येथील प्राथमिक शाळेत अशाप्रकारे दुधाच्या नावाने पाणीच वाटण्यात आलं आहे. माध्यमांनी हा प्रकार उघड केल्यानंतर जिलाधिकारी एस. राजलिंगम यांनी तात्काळ या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले.
 
शाळेत स्वयंपाक करणाऱ्या बाईंनी सांगितलं की त्यांना एक लूटर दूध देण्यात आलं होतं. म्हणून त्यांनी या एक लीटर दुधात पाणी टाकून सर्व मुलांना वाटलं.
 
दुसरीकडे घटनास्थळावर पोहचलेल्या अधिकाऱ्याने (SBSA) यात प्राथमिक चूक शिक्षकमित्राची असल्याचं दिसत आहे, असं मत व्यक्त केलं. तसेच या शिक्षकमित्राला निलंबित केल्याचीही माहिती त्याने दिली.