शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्याने नकारात्मकता दूर होते

गायीचे दर्शन घेऊन तिच्या पाठीवरुन हात फिरवल्यास आपल्या शरीरातील नकारात्मकता दूर होते. हा चमत्कार आहे, असे वक्तव्य महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. तिवसा तालुक्यातील एका गायीच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
 
या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक अभ्यासक घेतले जातात. त्यात मोठमोठे लोक प्रशिक्षण घेतात. पण यामुळे आपण संस्कृती विसरतो. आपल्यातील नकारात्मक विचार गायीच्या दर्शनामुळे, गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यामुळे जातात हे आपण विसरुन जातो. हे सर्व आपल्या संस्कृतीत सांगितले आहे.
 
गाय म्हणजे माता आहे. हा राजकारणाचा विषय नाही. चहावाल्या सरकारने गायीच्या मुद्द्यावरुन राजकारण केले. आता मात्र सर्वांनी मिळून काम करायचे आहे, असेही त्या म्हणाल्या.