शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (18:45 IST)

संजय राऊत - 27 मे नंतरही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील

विरोधकांनी कितीही डावपेच खेळले तरी 27 मेनंतरही उद्धव ठाकरे हेच राज्याच्या मुख्यमंत्रिपदी असतील, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं केला.  

"सध्याची परिस्थिती ही संघर्षाची आहे. कोरोनाच्या संकटात राजकीय मतभेद विसरून लढलं पाहिजे. मी जे राजभवनाबाबत ट्वीट केलं ते वाचनात आलेल्या घटनांवरून केलं. राजभवन हे पवित्र स्थान आहे. त्याचं पावित्र्य टिकून राहिलं पाहिजे."
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 27 मे पर्यंत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहाचे सदस्य होणं अनिवार्य आहे. त्यांच्या सदस्य होण्यात प्रक्रियेत कोणी आडकाठी करत असलं तरी उद्धव ठाकरेच राज्याचे मुख्यमंत्री असतील, असं राऊत म्हणाले