गुरूवार, 6 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

'बाळासाहेबांचे हिंदुत्व गुंडाळून शिवसेनेचे घूमजाव'

'Shiv Sena swoops in' infiltration of Balasaheb '
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला, त्यापायी मतदानाचा अधिकारही गमावला, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या राजकारणासाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला काळिमा फासला असून, हिंदुत्व खोटे ठरवले अशी खरमरीत टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.  
 
घूमजाव म्हणजे उद्धव ठाकरे अशी आता व्याख्या झाली असून, देव,देश आणि धर्म यासाठी भाजपबरोबर लोकसभेलाही युती करणाऱ्या शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करून मतदारांचा विश्वासघात केला असा टोला शेलार यांनी लगावला.
 
बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी प्रदीर्घ लढा दिला. मतदानाचा अधिकार गमावण्याची वेळ आली तेव्हा माझे एक मत गेले तरी चालेल पण करोडो हिंदू बांधव भरभरून मतं देतील अशी भूमिका घेतली. हिंदुत्वाच्या आधारे शिवसेनाप्रमुखांनी राजकारण करून यश मिळवलं. त्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी घूमजाव करून खोटं ठरवलं आहे.