गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 3 डिसेंबर 2022 (08:38 IST)

विनयभंग झाल्यावर पोलिसांची मदत मिळवून देणाऱ्या अथर्व आणि आदित्यला कोरियन तरुणी काय म्हणाली?

korean girl mumbai
मुंबईत कोरियन महिलेचा विनयभंग झाल्याची घटना व्हीडिओमुळे सोशल मीडियावर वेगाने प्रसारित झाली. या व्हीडिओला पोलिसांपर्यंत पोहोचवून पोलिसांनी सू-मोटो कारवाई करेपर्यंत मदत करणाऱ्या अथर्व आणि आदित्य या दोघांचे आभार त्या महिलेने मानले आहेत. या महिलेने त्या दोघांसोबत जेवणही केल्याचा व्हीडिओ तिने प्रसिद्ध केला आहे.
 
या जेवणाच्या व्हीडिओत ती अथर्व आणि आदित्यची ओळख करुन देते आणि त्यांच्या मदतीचा उल्लेखही करताना दिसते.
 
काय घडलं होतं?
मुंबईत घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देशाचंच नाही तर परदेशातील माध्यामांचंही लक्ष वेधून घेतलं आहे. दोन तरुणांनी यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम करणाऱ्या एका कोरियन मुलीचा विनयभंग केल्य़ाची ही घटना आहे.
 
ती मुलगी व्हीडिओचं चित्रिकरण करताना हजाराहून अधिक लोक तेथे होते, मात्र त्या त्रास देणाऱ्या तरुणांना तिच्यापासून दूर करण्यासाठी कोणीही मदत केली नाही अशी माहिती सोशल मीडियात व्यक्त होत आहे. ट्वीटरसारख्या समाजमाध्यमात काही लोक संतापही व्यक्त करत आहेत.
 
याप्रकरणी मोबिन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सद्री आलम अन्सारी अशी या दोघांची नावे असून त्यांच्यावर या कोरियन मुलीचा विनंयभंग केल्याबद्दल खार पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा नोंदवला आहे.
 
ट्विच या लाइव्हस्ट्रीमिंग सर्व्हिसवर विनयभंग झालेल्या मुलीचे 12,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. त्या व्हीडिओ गेम खेळताना आणि नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेतानाचे व्हीडिओ पोस्ट करतात.