मी अरुणाचल पाहिले - सौ. कमल जोशी

arunachal pradesh
सौ. कमल जोशी|
WD

कसले पाहिले? अरुणाचलचा एक लहानसा कोपरा पाहायचा मला योग आला. त्या मागासलेल्या प्रदेशात चि. अमोलची बदली झाली आणि थोडेस वाईट वाटले बापरे केवढ्या दूर गेला हा मुलगा? मनाला ग्रासून टाकले ह्या विचारांनी. ह्या विचारांत चूर असतांनाच ह्यांनी दोन ति‍कीटे माझ्यापुढे सरकविले. कलकत्यांचे! कलकत्याहून आसाममध्ये डिब्रुगडला जायचे आणि तिथून अरुणाचलमध्ये प्रवेश करायचा आयुष्यातला पहिलाच एवढा मोठा प्रवास. पण अगदी सुखासमाधानाने आम्ही डिब्रुगडहून विमानाने पासिघाटला पोहोचलो.
पासिघाटहून चार पांच तास जीपचा करून आम्ही अलाँग गाठले. अलाँग एक छोटेसे ठिकाण आहे. जिल्हाचे मुख्यालय सियाम नदीच्या काठावर वसलेले. 10-15 हजार लोक वस्तीचे चिमुकले गाव. सर्व कार्यालये तिथे आहेत. 1962 साली चीनने ह्याच्या जवळचे एक ठाणे जिंकले होते. पुन्हा हिंदुस्थानने कब्जा करून ते आपल्या ताब्यांत घेतले. चीनला खूप जवळ असल्यामुळे मिलीटरी खूप आहे तिथे, स्थानिक लोकांपेक्षा ‍मिलीटरी आणि ऑफिसर लोकांचीच संख्या लक्षात येते.
पासीघाटला आम्ही 11 वाजता विमातळावर उतरलो आणि एका वेगळ्याच संस्कृतीचे दर्शन आम्हाला घडले. सर्वप्रथम ज्या मायभूमीला भारभूत होऊन आमची जीप जात होती त्या भूमातेच्या कोरलेल्या खडकाचे दर्शन झाले. पहाड फोडून रस्ते तयार केले होते. एकीकडे झुळझुळ वाहणारी सियाम नदी तर दुसरीकडे हिरवागार गाऊन घातलेला हिमालय सृष्टिच्या भव्य आणि दिव्य कलात्मकतेचा साक्षात्कारच जणू! सर्व पहाडी मुलुख.
पहाड फोडून ट्रक बस आणि जीप ह्या गाड्या, जेमतेम जातील येवढेच लहान रुंदीचे रस्ते. रस्त्याच्या एका बाजूला उंच उंच पर्वत तर दुसर्‍या बाजूला दरी अनंतात वाहणारी खळखळ नदी किंवा झुळझुळणारा नाला. विराट, विशाल आणि कोमलही रूप दृष्टिस पडले आणि मन थक्क झाले. मोठ मोठ्या डोंगरावर माती दगड किंवा खडक कुठेच दिसले नाही. केवळ मोठमोठ्या बांबूचे वन आणि ‍‍अनेक प्रकारच्या वनस्पतींनी नटलेले डोंगर. डोंगरातून उगम पावलेली सियाम नदी मानसरोवरातून उगम पावलेल्या सियांग नदीला पांगींग नांवाच्या गावाजवळ येऊन मिळले. ह्या दोन नद्यांचा संगम मनाचा ठाव घेणारा आहे. ह्या दोन नद्या हातात हात घालण्यापूर्वी अरुणाचलचा खूप प्रदेश व्यापतात. अरुणाचल आसाममध्ये या संगमाला ब्रह्मपुत्रा हे नाव देतात. अलाँगपासून ह्या नद्यांचा संगम 15 ते 20 किलोमीट दूर आहे.
अलाँग जिल्ह्यात कामकी नावाचे एक लहानसे गाव आहे. तिथे सरकारी डेअरी आहे. सर्व जिल्ह्यात येथून दुधाचा पुरवठा होतो. इथे गाईचेच दुध वापरतात म्हशी नाहीतच. इथे मिथून नावाचे जनावर मोठे मानाचे मानले आहे. 'मिथून' हा 'गवा' म्हणजेच 'बायसन' सारखा प्राणी आहे. कामकीच्या डेअरीत मिथून आणि तिडकर्‍या गाई ह्यांचे क्रॉसबीड करून नवीन प्रकारच्या जनावराची निर्मिती करतात. ते जनावर तिकडल्या गाईप्रमाणेच होते पण धिप्पाड होते. त्याचे दूधही वापरण्यांत येते.
मिथून जेवढे जास्त 'ज्याकडे असतील तेवढा तो माणूस श्रीमंत असे समजतात. लग्नकार्यात मिथून मारून त्याचे मांस सर्व गांवात वाटतात. आपल्याकडे जस 'कार' दाराशी असली की आपण त्यांना श्रीमंत किंवा बडा समजतो तसेच गणा ज्याच्या घरी त्याच्या घरी मुलगी देणे योग्य, कारण प्रतिष्ठीत तो बडा समजतात. अरुणाचलच्या जंगलात मिथून आणि डुक्कर एवढीच जनावरे दिसतात. अरुणाचलचे एक वैशिष्ठ, तिथे चिमणी, पाखरे ह्यांचा खूप अभाव जाणवतो.
सकाळी 5.30 वाजताच झुंजूमुंज सुरू होते पण सूर्यनारायणाचे प्रत्यक्ष दर्शन हिवाळ्यात 12 ते 1 च्या दरम्यान होते. तोपर्यंत थंडी थंडी. साडेबारा ते 1 वाजता आलेले नारायणराव 3.30 ते 4 वाजताच आपल्या परतीचा प्रवास सुरू करतात त्या वेळेला सरकारी कर्मचार्‍यांची आठवण आली. साडेचारला अंधार होतो आणि साडेपाच वाजता रात्र! वीज नव्यानेच सुरू झाल्यामुळे विजेचा पुरवठा जेवढा हवा तेवढा होत नाही.
त्यामुळे रात्र फारच मोठी आणि कंटाळवाणी वाटते. उन्हाळ्यात म्हणजेच पावसाळ्यात (इथे दोनच ऋतू आहेत उन्हाळा व हिवाळा) कमालीचा पाऊस पडतो. धो धो पाऊस पडला की लगेच सूर्य उगवतो आणि इतकी उष्णता ओकतो की अंगाची आग आग होते. असा हा उन पावसाचा खेळ मी तरी पहिल्यांदाच अनुभवला. सूर्याची प्रखरता फारच प्रखरतेने जाणवते. आणि अरुणाचा 'आंचल' ह्या प्रदेशावर फारच प्रेमाने फिरतो असे जाणवते.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार
कोरोनामुळेअनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. हॉलिवूड इंडस्ट्रीवरही याचा परिणाम झाला आहे. ...

कनिका कपूर करोनामुक्त

कनिका कपूर करोनामुक्त
गायिका कनिका कपूरला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी तिचा सहावा रिपोर्ट ...

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत
करोनाविरोधातील लढाईसाठी बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान पुढे आले आहेत. ...

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ ...