शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

वाघांचे घर आहे बंधवगर्ह राष्ट्रीय उद्यान

वाघांचे गर्ह म्हणून प्रसिद्ध बंधवगर्ह राष्ट्रीय उद्यान मध्यप्रदेश राज्यातील उमरिया जिल्ह्यात स्थित आहे. 1968 साली हे उद्यान स्थापित झाले असून हे सुमारे 437 वर्ग किमी क्षेत्रफळात पसरलेले आहे. येथे सहजरित्या वाघ हिंडताना दिसून येतात.
या उद्यानात एक प्रमुख पहाड आहे जे बंधवगर्ह म्हणून ओळखलं जातं. 811 मीटर उंच या पर्वताजवळ लहान-लहान पर्वत आहे. पूर्ण उद्यान साल आणि बांबूच्या झाडांनी सुशोभित आहे. चरणगंगा येथील प्रमुख नदी आहे जी अभयारण्यातून निघते.
 
या क्षेत्रातील पहिला वाघ महाराज मार्तंड सिंग यांनी 1951 साली धरला होता. मोहन नामक या पांढर्‍या वाघाला आता महाराजा ऑफ रीवा येथील महालात सजवलेले आहे. येथील एक वाघीण सीताच्या नावावर सर्वाधिक फोटो घेतले असल्याचे रिकॉर्ड आहे. जेव्हाकी चार्जर नावाच्या एक वाघाला टूरिस्ट गाड्यांच्या जवळ जाऊन काही कृत्य दाखवल्यामुळे प्रसिद्धी मिळालेली आहे. सीता शिकार्‍यांच्या बळी पडली तर जार्चर वृद्ध होऊन 2000 साली ठार झाला. त्याला दफन केलेली जागा चार्जर प्वाइंट नावाने ओळखली जाते.
 
असे मानले जाते की येथे असलेले वाघ चार्जर आणि सीता चे वंशज आहे. यांचे अपत्य मोहिनी, लंगरू आणि बिट्टूदेखील टूरिस्ट गाड्यांजवळ जाण्याचे शौकीन होते.
 
येथील आकर्षण म्हणजे बांधवगर्हच्या डोंगरावर 2 हजार वर्ष जुना किल्ला आहे. वन क्षेत्र अनेक प्रकाराच्या वनस्पती आणि जीव-जंतूंनी आबाद आहे. जंगलात नीलगाय, हिरानं, काळवीट, सांभार, चितळ, जंगली कुत्रे, लांडगे, बिबटे, अस्वल, जंगली डुक्कर, लंगूर, माकड आणि इतर वन्यप्राणी आहे. या उद्यानात 22 जनावर तर 250 पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. याव्यतिरिक्त सापांमध्ये किंग कोब्रा, क्रेट, वाइपर सारखे साप भरपूर आहेत.
येथे जंगलात फिरण्यासाठी शासन द्वारा संचा‍लित वाहन आधीपासून बुक करावं लागतं. याव्यतिरिक्त खाजगी रूपात जंगलात फिरण्यासाठी नसल्यामुळे आधी बुकिंग करून तिथे पोहचावे लागतात. सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस होणार्‍या सफारी बुक करून वाघ आणि इतर जनावरांना जंगलात वावरताना बघण्याचा आनंद घेता येऊ शकतो.
 
योग्य वेळ:
ऑक्टोबर ते मध्य जून पर्यंतची वेळ उत्तम. बियर पाहण्याचे इच्छुक लोकांनी मार्च ते मे दरम्यान जावं कारण या दरम्यान महुआ नावाचे फुलं खाण्यासाठी बियर बाहेर पडतात. पक्षी पाहण्याचे शौकीन लोकांसाठी नोव्हेंबर ते मार्च दरम्यान जाणे योग्य ठरेल.
 
कसे पोहचाल:
येथून सर्वात जवळीक विमानतळ जबलपूर (164 किमी दूर)  आहे. हे खजुराहोहून सुमारे 237 किमी दूर आहे.
कटनी (100 किलोमीटर), उमरिया (33 किमी), सतना (120 किलोमीटर) हे रेल मार्गापासून जुळलेले जवळीक रेल्वे स्थानक आहेत. येथून टॅक्सीद्वारे बांधवगर्ह पोहचू शकता.