रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024 (07:30 IST)

Butterfly Parks: भारतातील सुंदर बटरफ्लाय पार्क

बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू हे सर्वांनाच पाहायला आवडते. रंगीबेरंगी फुलपाखरू पाहून प्रत्येकाचे मन आनंदित होते. मस्त आपल्या धुंदीमध्ये फुलपाखरू निसर्गात फिरत असते. या वेलीवरून त्या वेलीवर, झाडावर, फुलांवर, पानांवर विहार करीत असते. फुलपाखरू पाहिले की मन अगदी प्रसन्न होते. तसेच आपल्या भारत देशात देखील फुलपाखरांनी भरलेले  सुंदर बटरफ्लाय पार्क आहेत. जिथे रंगीबेरंगी फुलपाखरे पाहावयास मिळतात. आज आपण देशातील सुंदर असे बटरफ्लाय पार्क पाहणार आहोत. 
 
बटरफ्लाय पार्क ठाणे-
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये एक ओपन एअर पार्क आहे. हे पार्क पर्यटकांमध्ये आकर्षणाचा केंद्र आहे.तसेच या पार्क मध्ये अनेक रंगीबेरंगी फुलपाखरू पाहावयास मिळतात. ठाण्याच्या बटरफ्लाय पार्कमध्ये सुमारे 132 हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. या सुंदर ठिकाणी तुम्ही नक्कीच तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रपरिवारासोबत जाऊ शकतात. 
 
चंदीगड बोटॅनिकल गार्डनचे बटरफ्लाय पार्क-
चंदीगडचे बटरफ्लाय पार्क पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. हे पार्क सुमारे सात एकरात पसरलेले आहे. रंगीबेरंगी फुलपाखरे पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. येथे फुलपाखरांच्या जवळपास 35 प्रजाती आहे. तुम्हाला जर फुलपाखरे आवडत असतील तर इथे नक्कीच भेट द्या. 
 
असोला भाटी वन्यजीव अभयारण्याचे बटरफ्लाय पार्क- 
दिल्लीच्या असोला भाटी वन्यजीव अभयारण्यामध्ये बटरफ्लाय पार्क खूप प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांसोबत जाऊ शकता आणि फुलपाखरांमध्ये सुट्टीचा आनंद घेऊ शकता. या उद्यानात फुलपाखरांच्या अनेक प्रजाती पाहावयास मिळतात.
 
शिमलाचे बटरफ्लाय पार्क-
2008 मध्ये बांधण्यात आलेले हे बटरफ्लाय पार्क  4.2 हेक्टरमध्ये पसरलेले आहे. येथे फुलपाखरांच्या 300 हून अधिक प्रजाती आहे. तसेच हे एका डोंगराळ भागात बांधले असून हे उद्यान आणखीनच सुंदर दिसते. त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात.
 
बन्नेरघट्टा बटरफ्लाय पार्क-
कर्नाटक मधील बेंगळुरू मध्ये बॅनरघट्टा नॅशनल पार्क आहे. हे राष्ट्रीय उद्यान अंदाजे 260.51 चौरस किलोमीटर असून येथे प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. तसेच येथे स्नेक पार्क, बटरफ्लाय पार्क आणि प्राणीसंग्रहालय देखील आहे. येथील  बटरफ्लाय पार्क सुमारे 7.5 एकरमध्ये पसरलेले आहे, येथे फुलपाखरांच्या सुमारे 48 प्रजाती आढळतात. तसेच येथून तुम्ही प्राणी दत्तक घेऊ शकता.