मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (22:08 IST)

चित्रकूट धाम : वनवासावेळी राम, सीता आणि लक्ष्मणाने येथे केला होता मुक्काम

भारतीत प्रमुख तीर्थस्थळांपैकी चित्रकूट हे प्रमुख तीर्थस्थळ आहे. वनवासावेळी याठिकाणी राम, सीता आणि लक्ष्मणाने चित्रकूटाच्या घनदाट जंगलात मुक्काम केला होता, असा उल्लेख पुराणात आहे. कारवी, सीतापुर, कामता, कोहनी, नयागांव या पाच गावांचा संगम याठिकाणी आहे. नैसर्गिक पर्वतरांग, फेसाळत पडणारे धबधबे, नद्या, घनदाट जंगल पशू-पक्षी असे प्रफुल्लीत वातावरण याठिकाणी आहे.
 
कामदगिरी याठिकाणी भगवान रामाने वास केला होता त्यामुळे हे धार्मिकस्थळ बनले आहे. याचठिकाणी भरतमिलाप मंदिर आहे. श्रीरामाप्रती भक्ती असणारे श्रध्दाळू लोक याठिकाणी मनोभावे परीक्रमा करतात.
 
भरत कूप
याठिकाणे पवित्रकुंड भरताने बनविले आहे, असे सांगितले जाते. याठिकाणी ठिकठिकाणच्या पवित्र तीर्थस्थळावरील पाणी एकत्रित केले जाते.
 
जानकी कुंड
हे कुंड रामघाटावर आहे. नद्यांचा प्रवाह, हिरवळ असा निसर्ग पहाण्यासारखा आहे. शांत आणि सुंदर स्थान निसर्गाचा उत्तम नमूनाच म्हणावा लागेल. रामघाटावरून सुमारे 2 किमीच्या अंतरावर असणा-या जानकी कुंडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. रामघाटावरून नावेतूनही जाता येते.
 
शाप्तिक शिला 
मंदाकिनी नदीच्या किना-यापासून काहीच अंतरावर घनदाट जंगल आहे. येथील दगडांवर असणारे बोटांचे ठसे रामाचे असल्याचे मानण्या त येते.
 
गुप्त गोदावरी  
डोंगरांच्या मधोमध मधोमध नैसर्गिक सौंदर्यांमध्ये 'गुप्त गोदावरी' हे स्थान आहे. डोंगरातील गुहांमध्ये राम आणि लक्ष्मणाचा दरबार भरत, असे मानण्यात येते.
हनुमान धारा
डोंगराच्या टोकावरून एक धबधबा वाहत येतो याठिकाणी विविध मंदिर आहेत. याठिकाणी दर्शनासाठी भक्तगणांची गर्दी होते. येथून चित्रकूटचा विशाल नजारा आपणास पाहता येतो.
 
हौशी प्रर्यटकांसाठी पाहण्याजोगे खुप काही आहे. चाचाई आणि केओटी धबधबा नजीकच आहे. हे धबधबे 130 मीटर की उंचीवरून कोसळतात.