सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (18:09 IST)

रणवीर सिंह साकारणार कंगना राणौतच्या 'सीता'मध्ये रावणाची भूमिका

कंगना राणौत नेहमी वाद्याच्या भोवऱ्यात अडकलेली असते.परंतु कंगना राणौतने जाहीर केले आहे की ती अलौकिक देसाई यांच्या सीता चित्रपटात दिसणार आहे. करीना कपूरच्या हातातून हा चित्रपट निसटून आता कंगना राणौत पर्यंत पोहोचला आहे. कंगना राणौतचे चाहते कंगनाला सीता द इनकारनेशन या चित्रपटात सीतेच्या भूमिकेत पाहू शकतील. मीडिया वृत्तानुसार, सीता द इनकारनेशन या चित्रपटात रणवीर सिंगची एंट्री सुद्धा असू शकते.
 
एका रिपोर्टनुसार, सीता द इनकारनेशन चित्रपटात रावणाच्या भूमिकेसाठी रणवीर सिंह शी संपर्क साधण्यात आला आहे. रणवीर सिंह ला मे महिन्यात रावणाची भूमिका ऑफर करण्यात आली होती.सूत्रांच्या माहितीनुसार,असे म्हटले गेले आहे की रणवीर या भूमिकेसाठी उत्साहित आहे आणि तो सध्या अंतिम नरेशनची वाट पाहत आहे.
अद्याप या चित्रपटात रणवीर सिंह कोणत्या भूमिकेत असणार हे स्पष्ट नाही.परंतु कंगनाला या चित्रपटात सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.हे शिक्का मोर्तब झाले आहे.असे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.
 
सीता द  इनकारनेशन या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी करीना कपूरला प्रथम विचारण्यात आले. करीना सीतेची भूमिका साकारण्यासही तयार होती, पण नंतर करीना आणि निर्मात्यांमध्ये शुल्काबाबत जमू शकले नाही.
 
सीता द  इनकारनेशन या चित्रपटा चे लेखन बाहुबली लेखक केव्ही विजेंदर प्रसाद सीता  करत आहेत.केव्ही विजेंद्र प्रसाद यांनी कंगना रनौतची थलायवीही लिहिली आहे.
 
हिंदी व्यतिरिक्त, कंगना राणौतची सीता तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडसह 5 भाषांमध्ये रिलीज होईल, ज्याची निर्मिती सलोनी शर्मा एसएस स्टुडिओ करणार आहे.