Christmas 2024 : ख्रिसमसमध्ये भारतातील या 5 ठिकाणी द्या भेट
IndiaTourism : काही दिवसांत वर्ष संपणार आहे. तुम्हालाही या वर्षी भारतातील सुंदर आणि अप्रतिम ठिकाणांना भेट द्यायची असेल, ख्रिसमसच्या काळात सुट्ट्या असतात, त्यामुळे कुटुंब किंवा मित्रांसह या सर्वोत्तम ठिकाणांना नक्कीच भेट देऊ शकतात. आज आपण भारतातील अशाच काही ठिकाणांबद्दल पाहणार आहोत. जिथे तुम्ही ख्रिसमसमध्ये नक्कीच भेट देऊ शकतात.
शिलाँग-
तुम्ही ख्रिसमस साजरा करण्यासाठी शिलाँगला जाण्याचा विचार नक्कीच करू शकतात. हे सुंदर राज्य आहे. या ठिकाणी नवीन वर्षाचे सेलिब्रेशनही करता येईल. हे भारताचे सर्वोत्तम प्रवेशद्वार देखील मानले जाते. येथील वुडलँड हिल स्टे, सिल्व्हर ब्रूक होमस्टे सारखी ठिकाणे पर्यटकांसाठी आकर्षणाची केंद्रे आहे.
पुद्दुचेरी-
पुद्दुचेरी हा भारतीय केंद्रशासित प्रदेश असून पर्यटक सहसा येथे भेट देण्यासाठी आणि सुट्टी घालवण्यासाठी येतात. ख्रिसमसच्या निमित्ताने येथे उपस्थित असलेल्या प्रसिद्ध चर्चला भेट देता येते. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये येथील सौंदर्यात भर पडते.
केरळ-
सुंदर तलाव आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेण्यासाठी केरळ हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. डिसेंबरमध्ये येथील हवामान अतिशय आल्हाददायक असते. ख्रिसमसकरिता कुटुंबासोबत येथे सहलीचे नियोजन करू शकता.
शिमला आणि मनाली-
ख्रिसमससोबत हिमवर्षावाचा आनंद घ्यायचा असेल तर शिमला आणि मनालीला जाण्याचा प्लॅन करू शकता. भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. याशिवाय नववर्षानिमित्त येथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
गोवा-
ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त गोव्यात उत्साहाचे वातावरण असते. येथे ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मित्र किंवा कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या. इथली सजावटही खूप वेगळी आणि आकर्षक असते.