शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : गुरूवार, 4 एप्रिल 2024 (09:46 IST)

Coorg कुर्ग: स्कॉटलंड ऑफ इंडिया

स्कॉटलंड ऑफ इंडिया नावाने ओळखल्या जाणार्‍या कुर्गबद्दल म्हटले जातं की राम आणि लक्ष्मण सीतेला शोधत येथून निघाले होते.
 
म्हैसूर हून 120 किमी दूर स्थित कुर्ग म्हणजेच कोडागू. याचा अर्थ झोपलेल्या पर्वतावरील धुंध जंगल. कर्नाटकाच्या पश्चिम घाटात वसलेल्या या ठिकाण्यावर वातावरणात गारवा आहे. या शांत आणि थंडगार हिलस्टेशनावर पाहण्यासारखं खूप जागा आहेत.
 
येथे राजा सीट पार्क: जेथे कॉफीचे झाडं पाहायला मिळतात
कुशालनगर: तिबेटी मॉनेस्ट्री जेथे लाल आणि सोनेरी रंगाच्या पोषकांमध्ये संन्यासी दिसतात
निसारगधमा: नदीवर तयार केलेले स्पॉट
तलाकावेरी:‍ जिथून कावेरी नदीचा उद्भव होतो. येथील तीर्थ कुंडात स्नान करून लोकं जवळच प्रतिष्ठित शिवलिंगाची पूजा करतात. कावेरी नदीवर वॉटर राफ्टिंग केली जाऊ शकते.
इरूप्पू धबधबा: असे मानले आहे की राम आणि लक्ष्मण येथे सीतेला शोधत आले होते.
नागरहोल वाइल्डलाइफ सेंचुरी: येथे अनेक प्रकाराचे पशू आणि पक्षी बघायला मिळतात.
याव्यतिरिक्त ओंमकारेश्वर मंदिर, अब्बी फॉल्स, आणि इतर स्थळे प्रसिद्ध आणि दर्शनीय आहेत.
 
कसे पोहचाल: येथून जवळीक एअरपोर्ट मंगलोर (135 किमी) आणि बंगळुरु (250 किमी) आहे. म्हैसूर रेल्वे स्थानक (120 किमी) आणि मंगलोर आहे. बंगळुरु, म्हैसूर, मंगलोर आणि हसन (किमान 150 किमी) हून नियमित बस सेवा आणि टॅक्सी उपलब्ध असतात.
 
काय खरेदी करावी: कॉफी, मध, अंजीर, मसाले, ‍वेलची, काळे मिरे, अननसचे पापड, संत्रे. येथील सिल्क साड्यादेखील प्रसिद्ध आहे.