गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : गुरूवार, 15 जून 2023 (09:33 IST)

धुळीखेल: नेपाळचे अतिशय सुंदर हिल स्टेशन

नेपाळचे सौंदर्य हिमालयातील हिम टेकड्यांनी वेढलेले दिसते.या नैसर्गिक ठिकाणी फिरण्याचा मजाच काही और आहे. नेपाळ मध्ये जगातील दहा सर्वोच्च शिखरांपैकी 8आहेत.जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टसुद्धा इथे उभे आहे. स्थानिक लोक याला "सागरमाथा" म्हणतात. हे नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आहे. यासह 20000 फूट उंचीसह 240 शिखर आहेत.
 
देवांचे निवासस्थान, म्हणवले जाणारे नेपाळ मध्ये एक तीर्थक्षेत्र आहे,एक सुंदर नैसर्गिक क्षेत्र असण्यासह,आपण येथे रॉक क्लाइंबिंग आणि स्कीइंग तसेच रिव्हर राफ्टिंग आणि जंगल सफारी सारख्या खेळांचा आनंद घेऊ शकता.
येथील ककाणी आणि धुळीखेल या ठिकाणी जाऊन हिमालयाच्या रम्य मोहक वातावरणाचा आनंद घेऊ शकता.सुट्टी घालवण्यासाठी हे खूप छान आणि सुंदर ठिकाण आहे.उत्तरेकडील पर्वत आणि दक्षिणेकडील विशाल तलाव यांनी वेढलेले,गोसरई कुंड हे एक अतिशय आकर्षक पर्यटन स्थळ आहे.गोसरई कुंडात सरस्वती, भरव,सौर्य,गणेश कुंड अशे नऊ तलाव आहे. 
रॉयल चितवन राष्ट्रीय उद्यानात आपण नेपाळच्या भरपूर नेसर्गिक संपदा बघू शकतो.तीर्थक्षेत्रांसह नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण अशी बरीच ठिकाणे आहेत.
1 धुळीखेल नगर नेपाळच्या बागमती क्षेत्रात कावरे जिल्ह्यात आहे.धुळीखेल हे कावरेपालन चौक जिल्ह्याचे मुख्यालय देखील आहे. 
 
2 सुमारे 1,625 मीटर (5,330 फूट)उंचीवर वसलेले,हे धुळीखेल हिरव्यागार डोंगरांनी झाकलेले आहे.हिवाळ्यात बर्फाने झाकलेले हे डोंगर बघणे आश्चर्यजनक आहे.
 
3 हिमालयातील शिखर आणि सूर्योदयाचे सुंदर दृश्य पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.
 
4 हे स्थळ काठमांडूपासून 30 किमी च्या अंतरावर आहे.
 
5 येथून मानसलू,लमजंग,गणेश हिमाल, गौरीशंकर हिमाल, लमतांग, रोलवलिंग, महालंगुर और कुंभकर्ण हिमालय बघता येतात.
 
6 येथे टेकडीवर देवीचे प्रसिद्ध ठिकाण आहे ज्याला देबीस्थान म्हणतात.येथे प्रसिद्ध काली मंदिर,भगवती मंदिर आहे.डोंगरावर असंख्य पक्षी आणि फुलपाखरे बघण्याचे सुंदर दृश्य दिसतात.
 
7 आसपासच्या भागात थुलोचौर कावरे आणि गोसाईकुंडा अरण्य आहेत.येथे पक्ष्यांच्या 72 प्रजाती(60 टक्के रहिवासी आणि 35 टक्के प्रवासी दिसतात. 
 
8 जुन्या शहरात अनेक हिंदू आणि बौद्ध मंदिरे आहेत.नारायण मंदिर, हरसिद्धि मंदिर, गौखुरेश्वर महादेव,धुळीखेल मधील इतर स्मारकांमध्ये सरस्वती मंदिर,दक्षिणकाली, भगवान बुद्धांची विशालमूर्ती, भीमसेन, बालकुमारी,लंखाना,माई,तेपूचा मद्य,भैरभनाथ,बजरयोगिनी इत्यादी आहेत.