शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 21 जानेवारी 2019 (11:35 IST)

फक्त 400 रुपयांमध्ये फिरा गोवा

काय आपण विकेंडला गोवा फिरायची योजना बनवत आहे? जर आपण गोवेच्या सुप्रसिद्ध बीचवर आपला विकेंड इन्जॉय करू इच्छित असाल तर, आयआरसीटीसीने आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट पॅकेज आणले आहे. आयआरसीटीसी आपल्यासाठी गोवा बस टूर पॅकेज आणत आहे. हा बस पॅकेज 'होप ऑन होप ऑफ गोवा बाय बस' नावाने आहे.
 
चला या पॅकेजचे वैशिष्ट्य काय आहे जाणून घेऊ या... 
भारतीय तरुणांमध्ये गोवा हे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. गोवा येथे सुप्रसिद्ध बीच, पर्वत आणि समुद्र आहे. जर आपण निळा समुद्र, वाळूचे समुद्र यांचा आनंद घेऊ इच्छित असाल तर गोवा नक्कीच जा. आयआरसीटीसीच्या या पॅकेजसह गोवामध्ये पर्यटक फोर्ट अगुआदा, सिकरिम बीच / किल्ला, कॅन्डोलिम बीच, सेंट अँथनी चॅपल, सेंट अॅलेक्स चर्च, कलंगट बीच, बागा बीच, अंजूना बीच, चापोरा किल्ला आणि वॅगेटर बीच, डोना पॉला, गोवा सायन्स संग्रहालय आणि मिर्झा बीच फिरू शकता.  
या व्यतिरिक्त, या पॅकेजसह आपण कला अकादमी, भगवान महावीर गार्डन, पंजिम मार्केट, कॅसिनो पॉइंट, रिवर बोट क्रूझ आणि ओल्ड गोवा, सी कॅथेड्रल, सेंट कॅथरीन चॅपल, आर्क ऑफ वायसराय, एएसआय संग्रहालय, मॉल डी गोवा आणि सालगा चर्च येथे फिरू शकता.
 
* कसे बुक करावे - आपण आयआरसीटीसी पोर्टलवर बुक करू शकता. टूरच्या तारखेपूर्वी चार दिवसांपर्यंत आपले बुकिंग झाले पाहिजे, नाही तर या नंतर आपल्याला ही संधी मिळणार नाही. आपण बुकिंग केल्यानंतर आपल्याला इ-मेलद्वारे कन्फर्मेशन मिळेल. बसच्या सीट्स आरामदायक आहे. सर्व बसमध्ये एलईडी टीव्ही आहे.