शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : बुधवार, 9 मार्च 2022 (08:51 IST)

Holi 2022: यंदाची होळी या ठिकाणी साजरी करा, होळी अविस्मरणीय बनवा

होळीचा सण मार्च महिन्यात येतो.भारतात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. रंगांच्या सणानिमित्त देशभरात विशेष उत्सवाचे आयोजन केले जाते. होळीच्या निमित्ताने, घरी होळी न साजरी न करता कुठेतरी बाहेर फिरायला जायचे असेल, तर देशात अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, या ठिकाणी जाऊन आपण होळी साजरी करू शकता. यंदा होळी 17 आणि 18 मार्च रोजी आहे. आणि 19 आणि 20 मार्च विकेंड असल्यामुळे सलग 4 दिवस सुट्ट्या आल्या आहेत. आपण देशातील काही खास ठिकाणी होळीसाठी सहलीचे नियोजन कुटुंबासह करू शकता. हे ठिकाण कोणते आहेत जाणून घ्या.
 
1 केरळ- केरळ हे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय सुंदर राज्य आहे. केरळची सुंदर दृश्ये, भव्य समुद्रकिनारे बघण्यासारखे आहे. होळीच्या निमित्ताने केरळला जाणे अधिक चांगले होईल. येथे होळीला मंजुळ कुळी आणि उक्कुली या नावाने ओळखले जाते. येथे होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
 
2 मणिपूर- जर आपण घरापासून दूर होळी साजरी करण्याचा विचार करत असाल तर मणिपूरला  भेट द्या. मणिपूरमध्ये होळी आणि योसांग सण 6 दिवस चालतात. ज्यामध्ये दरवर्षी होळीमध्ये अनेक पर्यटक सहभागी होतात. या दरम्यान, खाण्यासाठी आणि पिण्यासाठी विविध स्थानिक स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेता येईल.
 
3 कर्नाटक- कर्नाटक ची होळीही खूप प्रसिद्ध आहे. कर्नाटकातील हम्पी शहरात होळीच्या निमित्ताने होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दोन दिवसीय होळी उत्सवात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात.
 
4 आसाम- यंदाची होळी साजरी करण्यासाठी आपण आसामला जाऊ शकता . चार दिवसांच्या सहलीवर जाऊन आसामच्या सौंदर्याचा आणि होळीचा आनंद घेऊ शकता. आसाममध्ये होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो. त्याला डोल जत्रा म्हणतात. येथे होळी देखील उत्तर भारतासारखीच साजरी केली जाते, ज्यामध्ये होलिका दहन होते. लोक मातीच्या झोपड्या बनवतात आणि जाळतात. दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. दरवर्षी मार्च महिन्यात येथे मोठ्या संख्येने लोक होळी खेळण्यासाठी येथे येतात.