रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. मराठी मालिका 'आई कुठे के करते' मधून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रूपाली भोसले हिच्या कारचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.
माहिती समोर आली की, अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच एक आलिशान गाडी विकत घेतली होती. आता माहिती समोर आली आहे की, आलिशान कारचा भीषण अपघात झाला आहे. व गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने अभिनेत्री सुरक्षित असल्यची माहित समोर आली आहे.
तसेच अभिनेत्रीने स्वतः ही माहिती तिच्या चाहत्यांशी शेयर केली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम आऊंटवर व्हिडीओ शेयर करत हि माहिती दिली.
Edited By- Dhanashri Naik