मुलाच्या आत्महत्येच्या खोट्या बातमीवर मराठी अभिनेत्री संतापली
अभिनेत्री रेशम टिपणीस ही टीव्हीचा एक लोकप्रिय चेहरा आहे. ती बिग बॉस मराठीमधूनही खूप प्रसिद्ध झाली. अलीकडेच, तिचा मुलगा मानवशी संबंधित अफवेवर अभिनेत्री संतापली आहे. अलीकडेच, रेशम टिपणीसच्या मुलाने आत्महत्या केल्याची बातमी आली. कांदिवलीमध्ये आत्महत्या करणारा मुलगा दुसरा कोणी नसून रेशम टिपणीसचा मुलगा असल्याचा दावा करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेत्रीने त्या अफवांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि अफवा पसरवणाऱ्यांवर टीका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री रेशम टिपणीसने माझा मुलगा सुरक्षित असल्याचे सांगितले अभिनेत्री रेशम टिपणीसने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने स्पष्ट केले की तिचा मुलगा पूर्णपणे ठीक आहे आणि जो कोणी अफवा पसरवत आहे त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अभिनेत्रीने लिहिले, "कृपया याकडे दुर्लक्ष करा. कोणीतरी माझा मुलगा मानव बद्दल खोट्या बातम्या पसरवत आहे. बाप्पांच्या आशीर्वादाने तो ठीक आहे आणि निरोगी आहे, परंतु ज्याने हे केले आहे तो तुरुंगात जाईल. असे देखील त्या म्हणाल्या.
Edited By- Dhanashri Naik