गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: रविवार, 19 डिसेंबर 2021 (17:01 IST)

ख्रिसमस घराबाहेर मित्रांसोबत साजरा करायचा असेल तर या ठिकाणांना भेट द्या.

तुम्ही खूप दिवसांपासून घरी वेळ घालवत असाल आणि मित्रांसोबत वेळ घालवायचा असेल तर ख्रिसमसचा सण अगदी योग्य आहे. वीकअँडच्या  निमित्ताने  मित्रांसोबत फिरायलाही जाऊ शकता. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे ख्रिसमस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जे पाहण्यासाठी पर्यटक जातात. मित्रांसोबत येथील सुंदर नजारे पाहण्याची मजाच वेगळी असेल. चला तर मग जाणून घेऊया ख्रिसमसच्या मुहूर्तावर कोणती ठिकाणे आहेत जिथे वेळ घालवणे योग्य ठरेल. 
 
1 केरळ- जर तुम्हाला थंडीच्या मोसमात अशा ठिकाणी जायचे असेल जिथे हवामान आल्हाददायक असेल आणि तुम्ही खूप मजा करू शकता. तर आपल्यासाठी केरळ हे सर्वात योग्य ठिकाण असेल. जिथे लोक गोव्याकडे वळतात.  केरळमध्ये ख्रिसमस सण उत्सवाचा दृश्य अतिशय विहंगम असतो. इथे चर्चमध्ये ख्रिसमसच्या खूप आधीपासून तयारी सुरू होते. त्याचबरोबर येथील स्थानिक रहिवासीही ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. 
 
2 मनाली -जर आपल्याला बर्फाच्छादित पर्वत आणि थंडी थोडी जास्त आवडत असेल. बर्फामध्ये ख्रिसमसचा आनंद घ्या. यासाठी हिमाचलमधील अनेक ठिकाणे अप्रतिम आहेत. पण या सगळ्या ठिकाणांमध्ये मनाली सर्वात खास आहे.
 
3 सिक्कीम -देशाच्या पूर्वोत्तर राज्यांपैकी एक असलेल्या सिक्कीममध्ये ख्रिसमसचा सण अतिशय सुंदर पद्धतीने साजरा केला जातो. येथे चर्चमधून सुंदर टेकड्या पाहण्याचा अनुभव पूर्णपणे वेगळा असेल. 
 
4 उटी - ख्रिसमसच्या निमित्ताने तमिळनाडूच्या प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक असलेल्या उटीला भेट देणं खूप खास असेल. प्रत्येकाला मित्रांसोबत इथली दृश्ये पाहायला जायला आवडेल. त्यामुळे यावेळी ख्रिसमसच्या मुहूर्तावर बाहेर जाण्याची  इच्छा असल्यास तर ही ठिकाणे खूपच प्रेक्षणीय असतील.