मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : मंगळवार, 18 जानेवारी 2022 (15:53 IST)

भारतातील या गावांमध्ये सूर्य दिसत नाही, सूर्यप्रकाश असून नेहमी संध्याकाळचं असते

भारतात अशी 12 गावे आहेत जी भूपृष्ठापासून 3000 किमी खाली वसलेली आहेत. या ठिकाणाबाबत अनेक कथाही प्रचलित आहेत. असे मानले जाते की हे तेच ठिकाण आहे जिथे माता सीता पृथ्वीमध्ये शिरली होती. त्याचवेळी काही लोकांचा असाही विश्वास आहे की जेव्हा भगवान श्री राम आणि त्यांचे बंधू लक्ष्मण यांना अहिरावणाने पाताळात नेले आले तेव्हा हनुमानजी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी या मार्गाने पाताळात गेले होते.
 
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यापासून सुमारे 78 किमी अंतरावर असलेले हे ठिकाण पातालकोट म्हणून ओळखले जाते. सातपुड्याच्या डोंगरात 12 गावांचा समूह आहे. पातालकोटमध्ये औषधांचा खजिना आहे. येथे भुरिया जमातीचे लोक राहतात. इतकंच नाही तर इथली 3 गावं अशी आहेत जिथे सूर्याची किरणेही पोहोचू शकत नाहीत. अशा स्थितीत प्रखर सूर्यप्रकाश असूनही संध्याकाळ झाल्यासारखी वाटते कारण ही गावे जमिनीपासून सुमारे तीन हजार फूट खाली वसलेली आहेत. या गावांपर्यंत पोहोचणे सोपे नाही, असे सांगितले जाते.
पातालकोटच्या या 12 गावांमध्ये राहणारे लोक बाहेरील जगापासून पूर्णपणे तुटलेले आहेत. असे म्हणतात की येथील लोक जवळच खाण्याच्या वस्तू पिकवतात आणि बाहेरून फक्त मीठ आणतात. मात्र, अलीकडेच पाताळकोटमधील काही गावांना रस्त्याने जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे.