suvichar
✕

निसर्गांनं नटलेलं केरळ

Updated: मंगळवार, 16 जुलै 2024 (09:04 IST)
 
वर्कला पापानासम बीच - 
याठिकाणी पर्यटकांची संख्या कमी असते. येथे सूर्यास्तावेळचे दृश्य मनमोहक दिसते. येथून केवळ 42 किमीवर तिरुअनंतपुरम आहे. येथील जर्नादन व अय्यपा मंदिरात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. 
 
केरळ नॅशनलपार्क - 
निसर्गसौदर्यांने नटलेले आणि केरळमधील वन्यप्राणी पाहण्यासाठी नॅशनलपार्क पाहण्याजोगा आहे. हिरव्यागार जंगलामध्ये आपल्याला अनेक वन्यप्राण्यांचे दर्शन होते. काही दुर्मिळ प्राणीही याठिकाणी आहेत. केरळमध्ये इर्रावीकुलम नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क, साईलेन्ट वॅली नॅशनल पार्क असेही पार्क आहेत. 
 
इर्रावीकुलम नॅशनल पार्क - 
'नीलगाय तराह' च्या संरक्षणासाठी या नॅशनल पार्कची स्थापना करण्यात आली आहे. हा केरळ आणि तमिळनाडूच्या सीमेवर आहे. हिमालयाच्या थंड वातावरणात रहाणारा नीलगाय हा दुर्मिळ प्राणी आहे. फुलापानांनी बहरलेल्या या पार्कला 1978 मध्ये नॅशनल पार्कचा दर्जा मिळाला आहे.
 
पेरियार नॅशनल पार्क -
हा पाकँ पश्चिमेला आहे. वाघाच्या संरक्षणासाठी याची निर्मिती करण्यात आली. आता हा पार्क जगभरात प्रसिध्द आहे. 1895 मध्ये इंग्रजांनी या पार्कची सुरूवात केली. त्यावेळी यांठिकाणी कृत्रिम तलाव आणि बांध बांधण्यात आला होता.
 
साईलेन्ट व्हॅली नॅशनल पार्क - 
कुंडलई टेकडीवर हा पार्क आहे. औषधी आणि झाडांच्या दुर्मिळ जाती याठिकाणी मिळतात. वाघ, सिंह, माकड असे प्राणी याठिकाणी आहेत. हा पार्क लहान आहे पण, नदी, डोंकर असे प्राण्यांसाठी अनुकूल वातावरण आहे.
 
वयनाड वाइल्ड लाईफ सेन्च्युरी - 
ही सेन्च्युरी वाघ आणि बिबट्यांसाठी प्रसिध्द आहे. बॉदीपुर नॅशनल पार्कचाच हा एक भाग आहे.
 
केरळमध्ये पाहण्याजोगे - 
मुन्नार, इड्डुकी, लक्कडी, मंगलम बांध, पेरीमेड, देवीकुलम आदीं हिल्सस्टेशन. बोलघट्टी पॅलेस, कोईक्कल पॅलेस, कृष्णापुरम महाल, कुथिरामलिका, द चित्रा आर्ट गॅलेरी, सेंट फ्रांन्सिस चर्च, टाउन हॉल आदीं केरळमधील प्रमुख स्मारक आहेत.
 
केरळमध्ये कधी जाल -
सप्टेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत याठिकाणचे हवामान उत्तम असते. यावेळी केरळमध्ये हजारो पर्यटक असतात. मात्र, पावसाळ्यात गर्दी कमी असते.

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांना चार वर्षे जुन्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

नाना पाटेकर माधुरी दीक्षितच्या शोमध्ये येणार होते, पण आता सोनाली बेंद्रे पहिली पाहुणी असेल

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवीची ९ मंदिरे; नवरात्रीत एकदा तरी दर्शन घ्यावे अशी श्रद्धा

माधुरी दीक्षित आणि सोनाली बेंद्रे पहिल्यांदाच एकत्र; ‘कोण होणार करोडपती’च्या शुभारंभात उलगडणार खास किस्से

पुढील लेख
Show comments