शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (15:06 IST)

Merry Christmas 2021: कुटुंबासह ख्रिसमस साजरा करण्यासाठी या 4 ठिकाणी जावे

वर्षाचा शेवटचा आणि जगभरात साजरा होणारा मोठा सण, ख्रिसमस जवळ येत आहे. दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस सण साजरा केला जातो. कुटुंब, मित्र, नातेवाईक ख्रिसमसला एकत्र येतात. पार्टी करून वर्षाला निरोप देतात आणि नवीन वर्षाची वाट बघतात. ख्रिसमसच्या निमित्ताने अनेकजण बाहेरगावी जाण्याचे बेत आखतात. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही, पण घरात कैद होण्याऐवजी अनेकजण ख्रिसमस साजरा करण्यासाठी सहलीचे नियोजन करतात. जर आपण घराबाहेर कुटुंब किंवा मित्रांसोबत ख्रिसमस साजरा करण्याचा विचार करत असाल तर आधी कुठे जायचे ते ठरवा. जरी देशात अशी अनेक शहरे आणि ठिकाणे आहेत जिथे ख्रिसमसचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, परंतु काही ठिकाणे फक्त ख्रिसमस पार्टीसाठी प्रसिद्ध आहेत.आम्ही देशातील अशा चार ठिकाणां बद्दल सांगत आहोत , जिथे जाऊन आपण ख्रिसमसचा सण अविस्मरणीय बनवू शकता. 
 
1 गोवा -  गोवा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. तर गोवा ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध आहे. गोव्यात ख्रिसमस पार्टी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लोक गोव्याला जाण्याची आतुरतेने वाट बघतात. गोव्यात लोक संगीत, नृत्य, मस्ती आणि बीचवर पार्टी करताना दिसतात. गोव्यातही अनेक प्रसिद्ध चर्च आहेत. आपण गोव्यात आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करू शकता.
 
2 कोलकाता - बंगालमध्ये ख्रिसमसचा उत्सव दुर्गा पूजेसाठी प्रसिद्ध आहे परंतु दरवर्षी हजारो लोक ख्रिसमसच्या उत्सवासाठी देखील येतात. कोलकात्यात ब्रिटीश राजवटीपासून नाताळ उत्साहात साजरा करण्याचा ट्रेंड सुरू झाला होता, जो आजतायगत सुरू आहे. कोलकातामध्ये नाताळच्या निमित्ताने लोक नाचतात, गातात आणि मजा करतात. ख्रिसमसच्या निमित्ताने पार्क स्ट्रीटचे दृश्य बघण्यासारखे आहे. या शिवाय कोलकाता येथील सेंट पॉल कॅथेड्रल चर्चमध्येही लोकांची गर्दी असते. येथे दरवर्षी ख्रिसमस फेस्ट आयोजित केला जातो.
 
3 शिमलाचे ख्रिसमस सेलिब्रेशन -डिसेंबरच्या हिवाळ्यात बर्फवृष्टीमध्ये सुंदर दिव्यांनी सजलेल्या हिल स्टेशनचे सौंदर्य पाहायचे असेल तर ख्रिसमसमध्ये शिमल्यात जा. ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी शिमला हा उत्तम पर्याय आहे. जोडप्यांसाठी, हे ठिकाण ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी सर्वोत्तम असेल. कालका ते शिमला टॉय ट्रेनचा आनंद घ्या. ब्रिटीश काळातील अनेक ऐतिहासिक वास्तूही येथे पहायला मिळतील. 
 
4 कोचीमध्ये ख्रिसमस कार्निव्हल - कोची शहरात अनेक जुनी आणि प्रसिद्ध चर्च आहेत. भारतातील सर्वात जुने युरोपियन चर्च देखील कोची येथे आहे. ख्रिसमस निमित्त येथे कार्निव्हलचे आयोजन केले जाते. कोची कार्निव्हलमध्ये म्युझिकल फायर वर्क, गेम्स, स्पोर्ट्स सारख्या एक्टिव्हीटी होतात.