शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (08:19 IST)

IPL 2021 Final: फाफ डुप्लेसिस आणि शार्दुल ठाकूर यांनी चौथ्यांदा चेन्नईला चॅम्पियन बनवले, कोलकाताचा अंतिम फेरीत पराभव

चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) आयपीएल 2021 च्या अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) 27 धावांनी पराभव केला. या विजयासह, सीएसकेने त्यांचे चौथे आयपीएल जेतेपद पटकावले. ही सर्व जेतेपदे धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने जिंकली आहेत. चेन्नईने यापूर्वी 2010, 2011 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावले होते.
 
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव करत जेतेपद पटकावले. यासह महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचा संघ चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला. 193 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआर संघाचे व्यंकटेश अय्यर (50) आणि शुभमन गिल (51) यांच्या अर्धशतकांनंतरही 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 165 धावा करू शकले. गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने तीन आणि रवींद्र जडेजाने दोन विकेट घेतल्या. तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईने फाफ डु प्लेसिस च्या 86 धावा आणि मोईन अलीच्या शेवटच्या षटकात 20 चेंडूंत 37 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत फक्त 3 गडी गमावून 192 धावा केल्या. रॉबिन उथप्पाने 31 आणि ऋतूराज गायकवाडने 32 धावांचे योगदान दिले. कोलकाताच्या बाजूने, फक्त सुनील नरेनने काही प्रभावी खेळी खेळून दोन गडी बाद केले.
 
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने ऋतू राज गायकवाड (32) आणि फाफ डुप्लेसिस  (86) यांनी चांगली सुरुवात केली आणि दोघांनी 8.1 षटकांत पहिल्या विकेटसाठी 61 धावा जोडल्या. ऋतूराज सुनील नरेनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला आणि शिवम मावीला झेलबाद दिले आणि निघून गेला. यानंतर, क्रिझवर आलेल्या रॉबिन उथप्पाच्या खेळीने  केकेआरच्या गोलंदाजांचा घाम काढला आणि 3 षटकारांच्या मदतीने अवघ्या 15 चेंडूत 31 धावा केल्या. नरेनने उथप्पालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आतापर्यंत यूएईच्या लेगमध्ये धावांची तळमळ असलेल्या मोईन अलीने अंतिम सामन्यात खूप चांगला खेळ खेळाला आणि त्याने फक्त 20 चेंडूंमध्ये दोन चौकार आणि तीन षटकार ठोकत 37 धावांची तुफानी खेळी केली. डुप्लेसिने 59 चेंडूत 86 धावा केल्या आणि तो डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला.
 
एका वेळी कोलकात्याने 10 षटकांत एकही विकेट न गमावता 88 धावा केल्या होत्या. संघ जिंकेल असे वाटत होते. त्यानंतर लॉर्ड शार्दुलने सामना उलटा केला. 30 मिनिटांत कोलकात्याने सात गडी गमावले आणि सामना पूर्णपणे चेन्नईच्या हातात होता. कोलकाताचे सात फलंदाज दुहेरी आकडाही स्पर्श करू शकले नाहीत. 
 
शुभमन गिलने (51) आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 11 वे शतक आणि या मोसमातील तिसरे अर्धशतक झळकावले.आयपीएलमध्ये नितीश राणा सहाव्यांदा शून्यावर बाद झाला. त्याला शार्दुलने बाद केले.
व्यंकटेशने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील चौथे अर्धशतक केले. 50 धावा केल्यावर तो बाद झाला.
नितीश (0), नरेन (2), मॉर्गन (4), कार्तिक (9), साकिब (0), राहुल त्रिपाठी (2) फार काही करू शकले नाहीत.
फर्ग्युसनने 18 आणि शिवमने 20 धावा केल्या. ब्राव्होने  मावीला बाद केले. तर वरुण शून्यावर नाबाद राहिला.
चेन्नईकडून शार्दुलने तीन आणि जडेजा-हेजलवूडने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचबरोबर दीपक आणि ब्राव्होला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
 
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन-
चेन्नई सुपर किंग्ज  : ऋतूराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेजलवुड.
 
कोलकाता नाईट रायडर्स:  व्यंकटेश अय्यर, शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इऑन मॉर्गन (क), दिनेश कार्तिक (wk), साकिब अल हसन, सुनील नारायण, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, लॉकी फर्ग्युसन.