मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 15 जानेवारी 2024 (11:53 IST)

Places to visit in Ayodhya :अयोध्येत बघण्यासारखे प्रेक्षणीय स्थळे

ayodhya
२२ जानेवारी २०२४ ला अयोध्यामध्ये श्रीराम मंदिराचे उद्घाटन होत आहे. याच दिवशी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तिची  प्राणप्रतिष्ठा होणार आहे . जर तुम्ही अयोध्या जात आहात तर तिथे श्रीराम मंदिर सोबतच काही महत्वपूर्ण स्थळांना भेट दयायला विसरु नका. सप्तपूरींमध्ये हिन्दू , जैन, बौद्ध आणि सिख समुदायची खुप महत्वपूर्ण धार्मिक स्थळ आहेत. इथे भारतीय धर्माचे काही स्मारक, मंदिर, पवित्र  स्थळे आहे. श्रीराम मंदिर सोबतच या स्थळांचे पण दर्शन घ्या
 
१. अयोध्याचे घाट : अयोध्या ही घाट आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध नगरी आहे. शरयु नदीच्या काठावर अयोध्या नगरी वसलेली आहे. शरयु नदीच्याकाठावर   14 प्रमुख घाट आहे. यात गुप्तद्वार घाट, कैकई घाट, कौशल्या घाट, पापमोचन घाट, लक्ष्मण घाट इत्यादी  विशेष उल्लेखनीय आहे. 
 
२. राम जन्मभूमी : अयोध्यामध्ये खास करून रामजन्मभूमीच्या दर्शनासाठीच जातात जिथे प्रभू श्रीराम विराजमान आहेत. 
 
३. हनुमान मंदिर : अयोध्येच्या मध्यभागी हनुमानगढी मध्ये रामभक्त हनुमानजी यांचे विशाल मंदिर आहे. 
 
४. दंतधावन कुंड : हनुमानगढ़ी क्षेत्र मध्येच दंतधावन कुंड आहे. जिथे प्रभू श्रीराम आपल्या दातांची स्वच्छता करायचे. यालाचा राम दतौन म्हणतात. 
 
५. कनकभवन मंदिर : अयोध्यामध्ये कनकभवन मंदिर पण बघण्यासारखे आहे. जिथे श्रीराम आणि जानकीची सुंदर मूर्ती ठेवलेली आहे. 
 
६. राजा दशरथ यांचे  महल : अयोध्यामध्ये राजा दशरथ यांचे  महल खुप प्राचीन आणि विशाल आहे. 
 
७. भगवान ऋषभदेव यांची जन्मस्थळी  : अयोध्यामध्ये एक दिगंबर जैन मंदिर आहे. जिथे ऋषभदेवजी यांचा जन्म झाला होता. अयोध्यामध्ये आदिनाथ व्यतिरिक्त अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतिनाथ आणि अनंतनाथ यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्मस्थळावर पण मंदिर बनले आहे. 
 
८. बौद्ध स्थळ : अयोध्येच्या मणिपर्वतवर बौद्ध स्तुपांचे अवशेष आहे. असे म्हणतात की, भगवान बुद्धांची प्रमुख उपासिका विशाखा हिने बुद्धांच्या सानिध्यात अयोध्यामध्ये धम्मची शिक्षा घेतली होती. याची स्मृति स्वरुप म्हणून विशाखाने अयोध्यामध्ये मणिपर्वताच्या जवळ बौद्ध विहाराची स्थापना केली. असे म्हणतात की, बुद्ध यांच्या महापरिनिर्वाण नंतर या विहारात बुद्धांचे दात ठेवले होते. वास्तविक इथे सातव्या शताब्दी मध्ये चीनी यात्री हेनत्सांग आला होता. या अनुसार येथे 20 बौद्ध मंदिर होते. तथा येथे 3000 भिक्षु राहत होते आणि इथे हिन्दुंच प्रमुख भव्य मंदिर होते. 
 
९. नंदीग्राम : अयोध्यापासून 16 किमी नंदीग्राम आहे, जिथे राहून भरताने राज्य केले होते. तसेच तिथे भरतकुंड सरोवर आणि भरताचे मंदिर आहे. 
 
१०. श्री ब्रम्हकुंड : अयोध्यामध्ये असलेले गुरुद्वारा ब्रम्हकुंडसाहिब यांच्या दर्शनासाठी देश आणि जगाच्या सर्व ठिकांवरून सिख भाविक येतात. असे म्हणतात की, सिख समुदायचे पाहिले गुरू नानकदेव, नववे गुरु तेग बहादुर आणि दहावे गुरु गोविन्दसिह यांनी गुरुद्वारा ब्रम्हकुंड येथे ध्यान केले होते. पौराणिक कथानुसार भगवान ब्रम्हा यांनी इथे 5000वर्षापर्यंत तपस्या केली होती. गुरुद्वारा ब्रम्हकुण्ड मध्ये असलेले गुरु गोविन्दसिंहजी अयोध्येला आलेल्या कथांशी जोडलेली चित्र आणि दुसरीकडे त्यांची निहंग सेनाचे शस्त्र  पण स्थापित आहे. ज्यांच्या बळावर त्यांनी मुघलांच्या सेनेपासून रामजन्म भूमि रक्षणासाठी युद्ध केले होते. 
 
११. इतर तीर्थस्थळे : याशिवाय सीताचे स्वयंपाकघर, चक्रहरजी विष्णु मंदिर, त्रेता चे ठाकुर, रामची पेढी, जनौरा, गुप्तारघाट, सूर्यकुंड, सोनखर, शरयु पार छपैया गांव, शरयु घाटा वर दशरथ तीर्थ, नागेश्वर मंदिर, दर्शनेश्वर मंदिर, मोती महल-फ़ैजाबाद, गुलाबबाड़ी-फ़ैजाबाद, तुलसी चौरा आदि स्थळे पण प्रेक्षणीय आहे.