शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 5 डिसेंबर 2022 (22:18 IST)

Places To Visit In December: डिसेंबरच्या सुट्टीत या ठिकाणी भेट द्या

Winter Travel Destination: वर्षाचा शेवटचा महिना आला आहे. डिसेंबरमध्ये हवामान थंड असते. या ऋतूत प्रवास करण्याची मजाच वेगळी असते. हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही कुठेतरी भेट देण्याचा विचार करत असाल तर डिसेंबर हा सर्वात चांगला काळ आहे. या महिन्यात प्रवासाची मजा दुप्पट होते. देशात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही या महिन्यात सहलीला जाऊ शकता. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यात सहलीला  जाण्याच्या विचार करत असल्यास या ठिकाणी भेट द्या आणि हिवाळी सुट्ट्या अविस्मरणीय करा. 
 
1 उत्तराखंडमधील बिनसार-
डिसेंबर महिन्यात उत्तराखंडच्या सहलीला जाऊ शकता. तसे, उत्तराखंडमध्ये अनेक हिल स्टेशन आहेत, कुमाऊं प्रदेशात वसलेले बिनसार हे शहर केदारनाथ आणि नंदा देवी यांच्या सुंदर शिखरांवरून दिसणारे एक छोटेसे हिल स्टेशन आहे.
 
2 उत्तराखंडमधील गनहिल -
हे उत्तराखंडमधील मसुरी येथील एक सुंदर हिल स्टेशन आहे. मसुरी हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. जर तुम्ही मसुरीला जाणार असाल तर गनहिलला नक्की भेट द्या. येथे बर्फाच्छादित पर्वत आणि सूर्याची झलक दिसते.
 
3 काश्मीरचे गुलमर्ग शहर-
 डिसेंबर महिन्यात मित्र आणि कुटुंबियांसोबत जम्मू-काश्मीरच्या गुलमर्ग शहरात सहलीला जाऊ शकता. याला देशाचे वंडर लँड म्हटले जाते, जिथे हिवाळ्यातील दृश्य परदेशी पर्यटन स्थळासारखे दिसते. बर्फाच्छादित दऱ्या, गोठलेले तलाव तुम्हाला भुरळ घालतील.
 
4 अरुणाचल प्रदेशातील तवांग-
डिसेंबरमध्ये वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अनेक डोंगराळ भागात बर्फवृष्टी होते. जर तुम्हाला थंडी आणि बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही अरुणाचल प्रदेशातील तवांग शहरात भेट देऊ शकता. तवांग हिवाळ्यात भेट देण्यासारखे एक ऑफबीट ठिकाण आहे. बर्फाच्छादित पर्वत आणि हिमालयाच्या खोऱ्यांचे अद्भुत दृश्य पर्यटकांना मोहून टाकतील.
 
Edited By- Priya Dixit