शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (16:52 IST)

कुटुंबासह सहली ची योजना करा, कर्नाटकातील चिकमंगळूरच्या प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घ्या

आजूबाजूला हिरवेगार असलेले डोंगर शांतता आणि निवांत क्षण घालवण्यासाठी सर्वोत्तम आहेत. चिकमंगळूर हे कर्नाटकातील एक रोमांचक हिल स्टेशन आहे, जे कोलाहलापासून दूर एकांतात वेळ घालवण्याचे उत्तम ठिकाण आहे. येथील टेकड्यांवर छान हवामान आणि सुंदर दृश्ये दिसतात. अनेक उपक्रमांमुळे हे ठिकाण पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हिवाळ्यात फिरण्याची एक वेगळीच मजा आहे. चिकमंगळूरमधील भेट देण्याच्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊया. 
 
1) कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान
चिकमंगलूरपासून 96 किमी अंतरावर कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान हे सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. इथे आपण  एक आगळा वेगळा अनुभव घेता. हे उद्यान समुद्रसपाटीपासून 1800 मीटर उंचीवर आहे. उन्हाळ्याच्या दिवसातही येथे सुखद हवामान असते. मात्र, हिवाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते.
 
 
2) हेब्बे वॉटर फॉल्स
1687 मीटर उंचीवरून पडणारा हा धबधबा अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. केम्मनगुंडी हिल स्टेशन येथे पोहोचता येते. हे 8 किमी अंतरावर आहे जे मोहक हिरवाईने वेढलेले आहे. घनदाट जंगले, सुंदर डोंगर हे ठिकाण आणखी सुंदर बनवतात. त्याच्या भोवती कॉफीचे मळे पसरलेले आहेत. हा धबधबा दोन भागात विभागलेला आहे. जे बिग फॉल्स आणि स्मॉल फॉल्स म्हणून ओळखले जातात. 
 
3) मुल्लानगिरी
कर्नाटकातील सर्वात उंच शिखर चिकमंगळूर आहे ज्याला मुल्लानगिरी म्हणतात. या शिखराची उंची 2000 मीटरच्या जवळ आहे. हा एक अतिशय सुंदर ट्रेकिंग ट्रेल्स आहे. मुल्लानगिरी हिमालय आणि निलगिरी दरम्यान सर्वात उंच पर्वत आहे. शिखरावर एक छोटेसे मंदिरही आहे.