बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : बुधवार, 30 ऑगस्ट 2023 (07:35 IST)

Raksha Bandhan 2023: या मंदिरात भाऊ-बहिणीला प्रवेश निषिद्ध आहे, चुकून जाऊ नका

Raksha Bandhan
Raksha Bandhan 2023:  रक्षाबंधनाचा सण 30-31 ऑगस्ट 2023 रोजी साजरा केला जात आहे. हिंदू मान्यतेनुसार राखी हा सण भाऊ-बहिणीच्या नात्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. रक्षाबंधनात भाऊ-बहिणी धार्मिक स्थळांना भेटी देतात, पूजा करतात आणि देवाचा आशीर्वाद घेतात आणि राखीचा सण साजरा करतात.
 
परंतु भारतात एक असे मंदिर देखील आहे, जिथे भाऊ आणि बहिणीने कधीही एकत्र जाऊ नये. या मंदिरात भावा-बहिणीसोबत जाण्यास आणि पूजा करण्यास बंदी आहे.या मंदिरात एकत्र प्रवेश करू नका. भाऊ आणि बहिणीसाठी प्रतिबंधित मंदिराबद्दल जाणून घेऊया.
 
छत्तीसगडमध्ये आहे अनोखे मंदिर-
छत्तीसगडमध्ये एक अनोखे मंदिर आहे, जिथे भाऊ आणि बहिणीला एकत्र प्रवेश करण्यास मनाई आहे. राज्यातील बालोदाबाजारमधील कसडोलजवळील नारायणपूर गावात असलेले मंदिर नारायणपूरचे शिवमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात भावा-बहिणीने एकत्र दर्शनासाठी जाऊ नये.
 
मंदिराचा इतिहास-
हे मंदिर 7व्या आणि 8व्या शतकात कलाचुरी शासकांनी बांधले होते. मंदिर लाल-काळ्या वाळूच्या दगडापासून बनवलेले आहे. मंदिराच्या खांबांवर अनेक सुंदर आकृती बनवल्या आहेत. मंदिर 16 खांबांवर आहे. प्रत्येक खांबावर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिरात एक छोटेसे संग्रहालय आहे, जिथे उत्खननात सापडलेल्या मूर्ती ठेवल्या आहेत.
 
भाऊ आणि बहीण एकत्र मंदिरात का जाऊ शकत नाहीत?
हे एकमेव मंदिर आहे जिथे भाऊ आणि बहिणीला एकत्र जाण्यास मनाई आहे. यामागे एक कथा आहे. मंदिराचे बांधकाम रात्रीच्या वेळी होत असे. सहा महिन्यांत मंदिर बांधले गेले. मंदिराचा आदिवासी समाजाशी संबंध आहे. शिल्पी नारायण रात्री नग्न अवस्थेत मंदिर बांधत असे.

दररोज मंदिर बांधणाऱ्या शिल्पी नारायणची पत्नी त्याला जेवण देण्यासाठी येत असे. पण एके दिवशी संध्याकाळी नारायणच्या बायकोऐवजी बहीण जेवण घेऊन बांधकामाच्या ठिकाणी आली. शिल्पी नारायण नग्न अवस्थेत मंदिर बांधत असे, आपल्या बहिणीला पाहून त्यांना लाज वाटली आणि त्याने  मंदिराच्या माथ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या कारणास्तव भावा-बहिणींना मंदिरात प्रवेश करणे निषिद्ध आहे. 
 
 





Edited by - Priya Dixit