रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

श्रीनाथजी मंदिर उदयपूर

Shreenathji
प्राचीन, ऐतिहासिक आणि पारंपरिक राजस्थान राज्याची यात्रा आध्यात्मिक अनुभव घेतल्याशिवाय अपूर्ण आहे. भारत हजारो वर्षे जुनी वेद आणि शास्त्रांची भूमी आहे. ज्यामध्ये समृद्ध पौराणिक भूतकाळ आहे. याकरिता आपण भूतकाळातील मनोरंजक आध्यात्मिक कथांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तसेच उदयपूर जवळ भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे प्रसिद्ध श्रीनाथजी मंदिर आहे, जे उदयपूरच्या 49 किमी उत्तर-पूर्व भागात नाथद्वारा मध्ये वसलेले आहे.  
 
श्रीनाथजी मंदिर हे श्रीकृष्णाच्या अर्भक अवताराला समर्पित आहे. बनास नदीच्या तीरावर वसलेले हे मंदिर अरवली पर्वतरांगांच्या विलोभनीय सौंदर्याने नटलेले आहे. अनेक भाविक आणि प्रवासी नाथद्वाराला भेट देतात आणि मंदिरात त्यांचा आदर करतात. व या मंदीरात सर्वत्र देवाची उपस्थिती अनुभवतात, तसेच स्थापत्यकलेची प्रशंसा करतात.
 
nathji
श्रीनाथजी मंदिर इतिहास-
मुघल शासक औरंगजेबाचा मूर्तीपूजेला विरोध होता. त्यामुळे त्याने मंदिरे पाडण्याचे आदेश दिले होते. ही घटना 1660 मधील आहे. जेव्हा औरंगजेबने राजकुमारी चारुमतीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा चारुमतीने स्पष्टपणे नकार दिला. मग राणा राज सिंह यांना निरोप आला. राणा राज सिंह यांनी विलंब न लावता किशनगडमध्ये चारुमतीशी लग्न केले. त्यामुळे औरंगजेबाने राणा राज सिंह यांना आपला शत्रू मानण्यास सुरुवात केली. 
 
तसेच ही दुसरी वेळ होती जेव्हा राणा राज सिंह यांनी औरंगजेबाला खुले आव्हान दिले आणि सांगितले की त्याच्या हयातीत बैलगाडीत ठेवलेल्या श्रीनाथजींच्या मूर्तीला कोणीही हात लावू शकणार नाही. औरंगजेबाला मंदिरात पोहोचण्यापूर्वी एक लाख राजपूतांशी सामना करावा लागेल. त्यावेळी जोधपूरजवळील चौपास्नी गावात श्रीनाथजींची मूर्ती बैलगाडीत होती आणि अनेक महिने चौपास्नी गावात बैलगाडीत श्रीनाथजींच्या मूर्तीची पूजा केली जात होती. तसेच हे चौपास्नी गाव आता जोधपूरचा भाग बनले आहे आणि ज्या ठिकाणी ही बैलगाडी उभी होती तिथे आज श्रीनाथजींचे मंदिर बांधण्यात आले आहे. श्रीनाथजींच्या चरण पादुका कोटापासून 10 किमी अंतरावर ठेवल्या गेल्या आहेत, त्या ठिकाणाला चरणचौकी म्हणून ओळखले जाते. 
 
मंदिर उत्सव आणि अनुष्ठा
श्रीनाथजी मंदिर मध्ये सर्व हिंदू सण उत्साहात साजरे केले जातात. जन्माष्टमी, दसरा, दिवाळी, अन्नकूट, मकरसंक्रांती, प्रबोधिनी एकादशी हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याशिवाय क्षेत्रीय उत्सव  हरतालिका, गणगौर देखील उत्साहात साजरे केले जातात. या सणांना श्रीनाथजी यांचा विशेष श्रृंगार व नैवेद्यासाठी प्रसाद तयार केला जातो.
 
मंदिरामध्ये सागर प्रसाद वाटलं जातो. ज्यामध्ये बदाम, साखर आणि तूप असते. याशिवाय मंदिरात रबडी, मसाला दूध, पुदिना चहा, थंडाई, साबुदाणा वडा, ढोकळा, भजे, लिंबू सोडा, गुजराती थाळी, राजस्थानी थाळी आणि बरेच काही चाखता येते.
 
श्रीनाथजी मंदिर उदयपूर जावे कसे?
तुम्ही उदयपूर शहरातून कॅब किंवा बसने सुमारे 1 तासात नाथद्वाराला पोहोचू शकतात. तसेच मारवाड जंक्शन हे पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद-दिल्ली मार्गावर वसलेले आहे. मावली पासून आधी नाथद्वारा 15 किमी अंतरावर आहे. कांकरोळी रेल्वे स्थानक नाथद्वारापासून 15 किमी  अंतरावर आहे. नाथद्वारा स्टेशनपासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर आहे. स्टेशन ते नाथद्वारापर्यंत अनेक बसेस सेवा उपलब्ध आहे. उदयपूर ते नाथद्वारा हे अंतर 48 किमी आहे. तसेच उदयपूरला देशातील प्रमुख शहरांमधून विमान, रेल्वे किंवा रस्त्याने जाता येते.