बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: गुरूवार, 15 ऑगस्ट 2024 (06:47 IST)

कुबेर भंडारी मंदिर वडोदरा

Mahadev Kuber Bhandari
भारतामध्ये एक असे कुबेर मंदिर आहे. जिथे दर्शन घेतल्यानंतर आजपर्यंत कोणीही रिकाम्या हाती परत आले नाही. चला जाणून घेऊ या मंदिराबद्दल. भारतात एक मंदिर आहे ज्याला कुबेर भंडारी मंदिर नावाने ओळखले जाते. या मंदिराबद्दल इथे एक लोककथा प्रचलित आहे. कोणता ही व्यक्ती धनत्रयोदशीच्या किंवा दिवाळीच्या दिवशी दर्शन करण्यासाठी जातो तो कधीही रिकाम्या हाती परतत नाही.
 
हे कुबेर भंडारी मंदिर गुजरात मधील वडोदरा शहराजवळ चानोद कर्नाळी गावात आहे. या प्रसिद्ध आणि पवित्र मंदिरामध्ये धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या काही दिवसांपूर्वीच भक्तांची गर्दी जमायला लागते. इथे फक्त गुजरात मधीलच नाही तर देशातील इतर राज्यातील देखील लोक दर्शनासाठी येतात. व धनप्राप्तीसाठी कुबेर देवाचा आशीर्वाद घेतात.
 
कुबेर भंडारी मंदिर इतिहास-
गुजरात मधील वडोदरा मध्ये असलेले कुबेर भंडारी मंदिराचा इतिहास खूप मनोरंजक आहे. सांगितले जाते की या मंदिराचे निर्माण सुमारे पंचवीश्ये वर्षांपूर्वी करण्यात आले होते. नर्मदा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर खूप सुंदर आहे. अनेक लोकांचे म्हणणे आहे की या मंदिराचे निर्माण साक्षात भगवान शंकरानी केले आहे. 
 
कुबेर भंडारी मंदिर पौराणिक आख्यायिका-
ज्या प्रकारे या मंदिराचा इतिहास मनोरंजक आहे. त्याच प्रमाणे या मंदिराची आख्यायिका देखील प्रचलित आहे, असे म्हणतात की, भगवान शिव आणि पार्वती पायी निघालेले होते. रस्त्यामध्ये माता पार्वतीला भूक लागली व तिने भगवान शंकरांना अग्रह केला. उमला भोजन आणि पाणी हवे. खूप शोधल्यानंतर देखील महादेवांना भोजन मिळाले नाही व ते नर्मदा काठी उभे राहिले. व याठिकाणी या मंदिराचे निर्माण झाले. यामुळे या मंदिराला भोजन देणारे किंवा धन देणारे मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरामध्ये दिवाळीपूर्वी भक्तांची गर्दी होते. येथील दर्शन घेणारा भक्त कधीही निराश होत नाही. तसेच एक मान्यता आहे की, जो भक्त धनत्रयोदशीच्या या मंदिराच्या परिसरातील माती घेऊन तिजोरीमध्ये ठेवेल त्याच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद अखंड राहतो.
 
कुबेर भंडारी मंदिर जावे कसे?
रस्ता मार्ग- वडोदरामधील रस्ते अनेक शहरांना जोडलेले आहे. तुम्ही टॅक्सी, कार किंवा बसने मंदिरापर्यंत पोहचू शकतात.
 
रेल्वे मार्ग- जवळच वडोदरा जंक्शन स्टेशन आहे. जे मंदिरापासून 65 किमी अंतरावर आहे. हा रेल्वेमार्ग अनेक शहरांना जोडतो. 
 
विमानमार्ग- या मंदिरापासून 60 किमी अंतरावर वडोदरा विमानतळ आहे. विमानतळावरून मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी तुम्ही टॅक्सी, कॅप बुक करून जाऊ शकतात.