आमेर किल्ला जयपूर
भारतातील राजस्थान राज्यातील जयपुर पासून फक्त 11 किमी दूर एका पर्वताच्या शिखरावर आम्बेर म्हणजेच आमेर किल्ला भक्कमपणे उभा आहे. लाल वाळूचा दगड आणि संगमरवरी मध्ये बांधलेल्या या किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. वाळवंटामध्ये हा किल्ला समृद्धि आणि भव्यताचे चित्र प्रस्तुत करतो. महाराजा मानसिंह प्रथम व्दारा 1592 मध्ये बनवला गेलेला हा किल्ला राजपूत व मुगल वास्तुशिल्प शैलीचा अद्भुत नजराणा आहे. ज्यामध्ये भव्य महल, मंदिर व अनेक अलंकृत दरवाजे आहे.
जेव्हा तुम्ही किल्ल्याच्या भव्य व्दाराजवळ पोहचतात तेव्हा समजते की याला तोडणे शत्रूंसाठी किती कठीण होते. राजस्थानची राजधानी जयपुर मध्ये स्थानांतरित झाल्यानंतर पहिले राजपरिवार इथेच राहायचा. तसेच प्रवेशव्दारा वरून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सूरज पोल पासून जलेब चौक नावाच्या मुख्य प्रांगण मध्ये पोहचतो. चंद्र ध्रुव विरुद्ध तिरकस दिशेने स्थित आहे. जलेब चौकातून पायऱ्या चढून शिलादेवी मंदिरात पोहोचता येते, ज्याच्या दरवाजांना चांदीचे उत्कृष्ट काम केलेले आहे.
तसेच मुख्य महल याच्या पुढे स्थित आहे. या किल्ल्यामध्ये नक्षीदार खांब आणि जाळीदार गॅलरी असलेले दिवाण-ए-आम, उत्कृष्ट चित्रकला किंवा शिल्पकला असलेले गणेश पोळ, शीश महाल म्हणून प्रसिद्ध असलेले जय मंदिर आहे. या किल्ल्यामधील अनेक सुंदर नक्षीदार खिडक्यांमधून त्यापैकी एकावर उभे राहून क्षितिजापर्यंत पसरलेले मैदान आणि गडाच्या पायथ्याशी असलेले मावता तलाव यांचे सौंदर्य बघता येते.
तसेच अनेक काळ उटलून गेल्यानंतर देखील या किल्ल्याचे सौंदर्य अजूनही इतिहासाची साक्ष देत आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे या किल्ल्यातील मुख्य स्थान म्हणजे शीश महल आहे. यामध्ये आश्चर्यचकित करणारे संगमरमर ने काम करण्यात आले आहे.तसेच छत आहे भिंतींना सुंदर आरशांनी सजवण्यात आले आहे. असे सांगण्यात येते की रात्री जेव्हा दिवा लावण्यात यायचा तेव्हा आरशामध्ये त्याचे प्रतिबिंब दिसायचे व लख्ख प्रकाश पडायचा. तसेच त्याला पाहून असे वाटायचे की जणू क्षितिजात असंख्य तारे झगमग करीत आहे. तसेच संध्याकाळी इतिहास जिवंत करणारा प्रभावशाली लाइट व साउंड शो अवश्य पाहावा.
कसे जावे?
दिल्ली, पंजाब, हरियाणा महाराष्ट्र, मध्यप्रदेश सारख्या राज्यातून जयपूरसाठी ट्रॅव्हल चालतात. तसेच रेल्वे सेवा देखील जयपूरमध्ये स्थित आहे. जयपूर रेल्वे स्टेशनवरून आमेर येथे जाण्यासाठी रिक्षा किंवा कॅप देखिले तुम्ही बुक करू शकतात. आमेर किल्ला जयपूर पासून 11 किमी अंतरावर आहे. तसेच जयपूरमध्ये विमानतळ देखील असल्याने विमान तळावरून टॅक्सी किंवा रिक्षा ने देखील जाऊ शकतात. तसेच खाजगी वाहनाने देखील इथपर्यंत पोहचता येते.