राजस्थान पुष्कर मधील सर्वात मोठ्या जत्रेला भेट द्या
राजस्थान हे भारतातील एक महत्वपूर्ण राज्य आहे. प्राचीन इतिहासाचा वारसा लाभलेले राजस्थान दरवर्षी हजारो पर्यटकांसोबत विदेशी पर्यटकांना देखील आकर्षित करते. तसेच तुम्हाला जर सर्वात मोठी जत्रा पाहायची असेल तर राजस्थानमधील पुष्कर येथे अवश्य भेट द्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजस्थानच्या पुष्करमध्ये जत्रा सुरू होणार आहे.
पुष्करमध्ये 9 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत या जत्रेचे आयोजन करण्यात आले असून राजस्थानची ही जत्रा खूप प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला सुंदर सजवलेले अनेक उंट दिसतील. तसेच या जत्रेला उंट मेळा या नावाने देखील ओळखले जाते. ही जत्रा राजस्थानच्या संस्कृती आणि परंपरांचे उत्तम उदाहरण आहे.
राजस्थानमधील उंटांची संस्कृती, खाद्य आणि विक्री पाहण्यासाठी लाखो पर्यटक या जत्रेत सहभागी होतात. या जत्रेत तुम्हाला अनेक सुंदर उंट पाहायला मिळतील. जे लोक सुंदर सजवून आणतात. या जत्रेचे सौंदर्य उंटावरूनच दिसून येते. कुटुंबासोबत वीकेंड घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
या जत्रेचे वैशीष्ट्ये म्हणजे जत्रेत धावणारे उंट, नाचणारे उंट, लोकसंगीत आणि नृत्य पाहायला मिळते. याशिवाय राजस्थानच्या जत्रेत विविध कला आणि कठपुतळीचा कार्यक्रमही पाहायला मिळतो. यंदा कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावर या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुष्करच्या या जत्रेत तुम्ही उंट सफारीचा आनंद घेऊ शकता. तसेच चांदण्या रात्री वाळूच्या ढिगाऱ्याखाली तळ ठोकण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. पुष्करमधील हॉट एअर बलून राईड देखील खूप मनोरंजक आहे. ज्यातून तुम्हाला संपूर्ण शहराचे विलोभनीय दृश्य पाहता येते. पुष्करच्या या जत्रेला जायचे असेल तर 9 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान जाता येईल. सकाळी 6.30 वाजता सुरू होऊन रात्री 8.30 पर्यंत सुरू राहणार आहे.
पुष्कर जत्रेला जावे कसे?
पुष्कर जत्रेला जाण्यासाठी पुष्करजवळील अजमेर हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. तसेच रस्ता मार्गाने जायचे असलीच खाजगी वाहन किंवा कॅप ची मदत घेऊ शकतात.