गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (21:50 IST)

ही पाच ठिकाणे जोडप्यांना फेब्रुवारीमध्ये भेट देण्यासाठी योग्य आहेत

These five places are perfect for couples to visit in Februaryही पाच ठिकाणे जोडप्यांना फेब्रुवारीमध्ये भेट देण्यासाठी योग्य आहेत Bharat Darshan Marathi Tourism Marathi   In Webdunia Marathi
फेब्रुवारी महिना जोडप्यांसाठी खास असतो. याला रोमँटिक महिना असेही म्हणतात. जर आपणही व्हॅलेंटाईन वीक स्पेशल बनवण्यासाठी एखादे सुंदर डेस्टिनेशन शोधत असाल, तर आपल्या खास यादीत या ठिकाणांचा समावेश करू शकता.
 
जोधपूर - हे राजस्थानचे शहर ब्लू सिटी म्हणून ओळखले जाते. येथे अनेक ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळतील. इथे आपण राजेशाही थाट आणि इमारती पाहू शकता. उम्मेद भवन पॅलेस, मेहरानगड किल्ला, राव जोधा डेझर्ट रॉक पार्क, घंटा घर ही येथील प्रसिद्ध ठिकाणे आहेत. 
 
नैनिताल - हे उत्तराखंडमधील सुंदर ठिकाणांपैकी एक आहे, जर आपल्याला डोंगर आणि पाणी आवडत असेल तर आपण नैनितालला भेट देऊ शकता. सौम्य हिवाळ्याच्या सुरुवातीला  नैनिताल हे खूप सुंदर ठिकाण  आहे. नैना झील, नैना देवी मंदिर, राजभवन, गोविंद बल्लभभाई पंत चिडिया घर, टिफिन टॉप यांसारखी अनेक रोमांचक ठिकाणे आहेत. 
 
गोवा - हनिमून डेस्टिनेशन्समध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहे. येथे आपण नाईट लाईफचा आनंद घेऊ शकता . बजेट डेस्टिनेशनमध्ये गोवा हे कोणत्याही परदेशी ठिकाणापेक्षा कमी सुंदर नाही. येथे आपण जोडीदारासह दर्जेदार वेळ घालवू शकता. 
 
पचमढ़ी - हे मध्य प्रदेशातील एक सुंदर ठिकाण आहे. हे आपल्याला नक्की आवडेल. येथे  जटाशंकर गुहा, पंचमढी धबधबा, पांडव गुंफा, भेडाघाट अशा रंजक ठिकाणांशिवाय इथले निसर्गसौंदर्यही बघण्या जोगते आहे.
 
रन ऑफ कच्छ - नदी, पर्वत आणि धबधबे याहून वेगळे काही पाहायचे असेल तर गुजरातमधील रन ऑफ कच्छ हे आपल्यासाठी योग्य ठिकाण आहे. गुजरातमधील कच्छ शहरात जगातील सर्वात मोठे मीठाचे वाळवंट आहे, जे 'कच्छचे रण' म्हणून प्रसिद्ध आहे. एका बाजूला राजस्थानचे थारचे वाळवंट आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा सिंध प्रांत आहे.