शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:27 IST)

Har Ki Pauri गंगा घाटाचा भगवान विष्णूशी काय संबंध आहे?

उत्तराखंडला देवांची भूमी म्हटले जाते. देवभूमी उत्तराखंडमध्ये मोठी धार्मिक स्थळे आहेत. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ हे चार धाम उत्तराखंडमध्ये आहेत तसेच हरिद्वारमध्ये हर की पौरीचे खूप महत्त्व आहे. हर की पौरी हे हरिद्वारमधील सर्वात महत्त्वाचे धार्मिक स्थळ असून येथे दरवर्षी लाखो भाविक गंगेत स्नान करतात.

हर की पौरी अर्थात प्रभू विष्णूचे पाय. प्राचीन काळी समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर पडलेल्या अमृतावर देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले तेव्हा विश्वकर्मा राक्षसांकडून अमृत हरण करत असताना अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले होते. जिथे -जिथे हे थेंब पडले तिथे- तिथे धार्मिक स्थळे निर्मित झाले. तेव्हा हरिद्वारमध्येही काही थेंब पडले होते आणि नंतर या ठिकाणाला हर की पौरी असे म्हणतात.
 
हर की पौड़ी येथे गंगा स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होत, अशी श्रद्धा आहे. हर की पौरी येथे दररोज हजारो भाविक गंगेत स्नान करतात.

हर की पौरी हरिद्वारचा मुख्य गंगा घाट असून येथूनच गंगा पृथ्वीवर अवतरली असे मानले जाते.  प्रचलित समजुतीनुसार हर की पौरी येथील एका खडकावर प्रभू विष्णूच्या पावलांचे ठसे आहेत. त्यामुळे हा घाट हर की पौरी म्हणून ओळखला जातो.