रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024 (12:47 IST)

मराठी रंगभूमी दिन

Theater
मराठी रंगभूमी दिन हा प्रतयेक वर्षी 5 नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो. तसेच मराठी रंगभूमी दिन साजरा करण्याचे कारण हे आहे की, 1843 मध्ये विष्णुदास भावे यांनी सांगली मध्ये 'सीता स्वयंवर' नाटक सादर केले होते. हे मराठीमध्ये लिहले गेलेले पहिले नाटक होते. या नाटकानंतर मराठी रंगभूमी दिन साजरा केला जाऊ लागला. 
 
सामाजिक बदलप, प्रतिभा, सर्जनशीलता यांचा एक ठेवा म्हणजे मराठी रंगभूमी होय. तसेच हा दिवस मराठी रंगभूमीच्या कलाकारांना आदरांजली वाहण्यासाठी व कलेप्रती असलेल्या भावनेची जाणीव करण्यासाठी संधी देत असतो. 
 
तसेच मराठी नाट्यसंस्कृतीचा पाय विष्णुदास भावे यांनी घातला. 1843 मध्ये विष्णुदास भावे यांनी सांगली मध्ये 'सीता स्वयंवर' नाटक सादर केले होते. याच नाटकाने नाट्यसृष्टीचा पाया रोवला. विष्णुदास भावे यांनी सांगली मध्ये 'सीता स्वयंवर' नाटक सादर केले होते. तसेच हे मराठी भाषेतील पहिले नाटक होते. 
 
तसेच मराठी रंगभूमीची परंपरा खोलवर रुजली असली तरी कथाकथन तंत्र आणि समकालीन संकल्पनाशी जुळवून घेत असून नवीन प्रतिभेचा शोध घेत आहे. तसेच सातासमुद्रा पलीकडे मराठी नाटकांची पताका फडकत आहे.  

Edited By- Dhanashri Naik