मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (08:59 IST)

आवळा वृक्ष हे भगवान विष्णूचे रूप आहे

पद्म पुराणात असे सांगितले आहे की भगवान शिवाने कार्तिकेयाला सांगितले आहे की आवळा वृक्ष हे विष्णूचे रूप आहे. हे विष्णू प्रिय असून त्याचे ध्यान केल्याने गोदानाच्या बरोबरीचे फळ मिळते.
 
आवळ्याच्या झाडाखाली श्री हरी विष्णूच्या दामोदर रूपाची पूजा केली जाते. अक्षय्य नवमीची उपासना संतानप्राप्तीच्या इच्छेने केली जाते आणि सुख, समृद्धी आणि अनेक जन्मांचे पुण्य क्षय न होवो, अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी लोक कुटुंबासह आवळ्याच्या झाडाखाली अन्न तयार करून घेतात. यानंतर ते ब्राह्मणांना पैसे, अन्न आणि इतर वस्तू दान करतात.
 
या व्रताशी संबंधित श्रद्धा
 
या दिवशी महर्षी च्यवन यांनी आवळा सेवन केला होता. त्यामुळे त्यांना पुन्हा तारुण्य प्राप्त झाले. त्यामुळे या दिवशी आवळे खावीत.
कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवमीला आवळ्याच्या झाडाची प्रदक्षिणा केल्याने रोग आणि पापांपासून मुक्ती मिळते.
या दिवशी भगवान विष्णू आवळ्यात निवास करतात. त्यामुळे या वृक्षाची पूजा केल्याने समृद्धी वाढते आणि दारिद्र्य येत नाही.
अक्षय्य नवमीला देवी लक्ष्मीने भगवान विष्णू आणि शिव यांची आवळ्याच्या रूपात पूजा केली आणि या झाडाखाली बसून अन्न घेतले.
या दिवशी भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध करण्यापूर्वी तीन वनांची परिक्रमा केली होती, असेही मानले जाते. यामुळे अक्षय नवमीला लाखो भाविक मथुरा-वृंदावनाची प्रदक्षिणा करतात.