1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (21:30 IST)

व्हॅलेंटाईन डेला जोडप्यांसाठी ही चार ठिकाणे फिरण्यासाठी योग्य

These four places are perfect for Valentine's Day couples व्हॅलेंटाईन डेला जोडप्यांसाठी ही चार ठिकाणे फिरण्यासाठी योग्य  Bharat Darshan Tourism Marathi  In Webdunia Marathi
रसिकांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. या महिन्यात जोडपे एकमेकांवरील  प्रेम व्यक्त करतात. एकमेकांसोबत वेळ घालवातात. व्हॅलेंटाईनडेच्या आठवड्यातील वेगवेगळ्या दिवसांनुसार आपल्या जोडीदारावर आपले प्रेम व्यक्त करतात.
 
जर आपल्याला ही तुमचा व्हॅलेंटाइन वीक खास बनवायचा असेल आणि तुमच्या जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवायचा असेल तर आपण एक खास ट्रिप प्लॅन करू शकता. देशात अशी अनेक रोमँटिक ठिकाणे आहेत जिथे आपण जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता. येथे आपण नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. आणि आपल्या जोडीदारासह आनंदायी क्षण घालवू शकता. चला तर मग जाणून घ्या कोणती आहे ही ठिकाण.
 
1 उटी, तमिळनाडू - जर आपल्याला नैसर्गिक सौंदर्य आणि पर्वतांची आवड असेल तर आपण जोडीदारासोबत तामिळनाडूच्या उटी शहरात जाऊ शकता. उटी हे खूप रोमँटिक ठिकाण आहे. जोडप्यांसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. थंड बर्फाळ वाऱ्यांमध्ये जोडप्याचे प्रेम  द्विगुणित होईल. येथे अनेक सुंदर तलाव आहेत. उटी लेक, पायकारा लेक, एमराल्ड लेक, अपर भवानी लेक आणि कामराज सागर सरोवर, जिथे आपण जोडीदारासोबत वेळ घालवू शकता.
 
2 कुमारकोम, केरळ कुमारकोम - शहर केरळमधील वेंबनाड तलावाच्या काठावर वसलेले आहे, जे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. कुमारकोममध्ये जोडपे बॅकवॉटर क्रूझचा आनंद घेऊ शकतात. तलावाच्या मध्यभागी सर्व बाजूंनी शहराच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आपण एखादी खाजगी बोट देखील बुक करू शकता.
 
3 नैनिताल, उत्तराखंड -प्रेमी जोडपे फेब्रुवारी महिन्यात नैनितालला सहलीला जाऊ शकतात. नैनिताल हे उत्तराखंडमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथे आपण जोडीदारासह पर्वत, तलाव, बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता. हिवाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य अधिकच आकर्षक होते. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपण  नैनितालमध्ये आपल्या जोडीदारासह  प्रेमाचे आनंदायी क्षण घालवू शकता.
 
 4 गोव्याच्या- थंड वातावरणात जर आपल्याला गरम ठिकाणी जायचे असेल तर प्रेमी जोडपी गोव्याला जाऊ शकतात. गोवा हे भारतातील सर्वोत्तम हनिमून डेस्टिनेशन्सपैकी एक आहे. अशा परिस्थितीत व्हॅलेंटाईन वीकमध्ये जोडपे गोव्याला जाऊ शकतात. येथे आपण जोडीदारासह  बीचवर आनंदाचे क्षण,घालवून या क्षणाला अत्याधिक रोमांचित बनवू शकता.