शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (14:02 IST)

पावसाळ्यात प्रवास करताना या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे

कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण जसजसे कमी होत गेले तसतसे लोक फिरायला जाण्याची योजना करू लागले आहेत. अलीकडेच हिल स्टेशन्सवरील व्हायरल फोटोंवरुन याचा अंदाज आलाच आहे. सरकारने हिमाचल आणि उत्तराखंडमधील लॉकडाऊनमध्ये शिथिलता जाहीर केली आणि सीमा उघडताच लोकांची गर्दी भेटायला आली. अशा स्थितीत आता सर्वत्र पावसाळा सुरू झाला आहे. म्हणून प्रवास करण्यापूर्वी काही गोष्टी तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण या दिवस जिथे प्रवास करायला जाता तिथे आपण एकदा हवामानाबद्दल वाचले पाहिजे.
 
आपल्यासोबत ट्रॅव्हल रेनकोट घेऊन जा. आपल्या हाताशी असलेल्या बॅगमध्येच छत्री किंवा रेनकोट असू द्या. तसंच हलका पाऊस येत असल्यास रेनकोट घालूनच फिरणे योग्य ठरेल.
 
एक लहान मेडिकल बॉक्स ठेवा. ज्यामध्ये डोकेदुखी, उलट्या, ताप, मलम आणि मलमपट्टी अशी औषधे असू द्या. अडचणीच्या वेळी हे किट खूप उपयुक्त ठरतं.
 
पावसाळ्यात थोडीशी थंडी जाणवणे साहजिक आहे. अशा परिस्थितीत सोबत काही उबदार कपडे ठेवा. आपल्याबरोबर लहान मुले असल्यास, त्यांच्यासाठी उबदार कपड्यांची पिशवी तयार करण्याचे सुनिश्चित करा.
 
पावसाळ्यात वीज कपात मोठी गोष्ट नाही, जरी हॉटेल्समध्ये जनरेटरची व्यवस्था असते तरी स्वत:जवळ पॉवर बँक ठेवा. खाण्यापिण्याची वस्तूंही ठेवा. स्नॅक्स आणि बिस्किटे आपल्या हाताशी असलेल्या पिशवीत असू द्या.