रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (23:14 IST)

Winter special Honeymoon Destinations : ही आहे हिवाळ्यातील सर्वोत्तम हनिमून डेस्टिनेशन

आता तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराय सुरु होणार आहे. लग्नानंतर मुला-मुलीचे एक नवीन आयुष्य सुरु होते. लग्नानंतर नवीन नाती जुळतात. पती पत्नीमध्ये एक सुंदर नातं सुरु होते. लव्ह मॅरेज असेल तर दोघांना एकमेकांबद्दल चांगलीच माहिती असते. पण अरेंज मॅरेज असेल तर दोघांना एकमेकांना समजून घ्यायला वेळ लागतो. या साठी दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवायचा असतो. कौटुंबिक आणि घरातील कामात व्यस्त असल्याने नवविवाहित जोडपे एकमेकांसोबत वेळ घालवत नाहीत.या साठी जोडपे हनिमून जातात.

जेणे करून त्यांना एकमेकांसोबत वेळ देता येईल. हनिमून हा एक प्रसंग आहे जेव्हा जोडपी लग्नानंतर आरामासाठी आणि एकमेकांसोबत वेळ घालवायला जातात. ज्यांचे लग्न हिवाळ्यात होत आहे  आणि हिवाळ्यात हनिमूनला जाण्याचा विचार करत असाल तर आधीच तयारी करा. सर्व प्रथम, हिवाळ्यासाठी सर्वोत्तम हनिमून ठिकाणे निवडा
हे काही हनिमून डेस्टिनेशन आहे. जिथे आपण लग्नानंतर जोडीदारासोबत जाऊ शकता. चला जाणून घेऊ या. 
 
दार्जिलिंग- 
दार्जिलिंग हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. चहाच्या बागांसोबतच हे ठिकाण हनिमून डेस्टिनेशनसाठी प्रसिद्ध आहे. दार्जिलिंगला ‘क्वीन ऑफ हिल्स’ म्हणूनही ओळखतात . हनिमून अविस्मरणीय बनवण्यासाठी दार्जिलिंगची निवड करत असाल, तर येथील नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊ शकेल. टॉय ट्रेनने तुम्ही दार्जिलिंगमध्ये फिरू शकता. जोडीदारासोबत ट्रेनमध्ये बसून तुम्ही चहाच्या बागा, देवदाराची जंगले, तीस्ता आणि रंगीबेरंगी नद्यांचा संगमचे सुंदर दृश्य पाहू शकता. जोडीदारासोबत  टायगर हिलवरून आणि कांचनजंगामागे सूर्य उगवताना पाहू शकता. हवामान स्वच्छ असल्यास, जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट देखील दृश्यमान होऊ शकतो. 
 
केरळ- 
तुम्हाला शांत ठिकाण आवडत असेल. तर हनिमूनसाठी तुम्ही केरळ देखील निवडू शकता . केरळ हे समुद्रकिनारे, बेटे, घाट, हिरवेगार पर्वत, चहा-कॉफीचे मळे आणि वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे. इराविकुलम आणि पेरियार सारखी राष्ट्रीय उद्याने आहेत आणि तुम्ही वायनाड सारख्या सुंदर ठिकाणांना भेट देण्याचा आनंद घेऊ शकता.  
 
गोवा- 
हिवाळ्यात जोडपे हनिमूनसाठी गोव्याला जाऊ शकतात . गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि हनिमूनसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. येथे समुद्रकिनाऱ्यावर, नवविवाहित जोडपे फिरतात. गोव्यात क्रूझवर लेट नाईट पार्टी, रोमँटिक डिनर डेटचाही आनंद घेऊ शकता. गोव्यात तुम्ही कलंगुट बीच, बागा बीच, वगेटोर बीच आणि पालोलेम बीचला भेट द्या. 
 
गुलमर्ग-
काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात. विवाहित जोडप्यांसाठी काश्मीर स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. काश्मीरच्या खोऱ्यात फिरायची इच्छा असेल तर तुम्ही गुलमर्गला जाऊ शकता. काश्मीरमध्ये असलेले हे हिल स्टेशन खूप लोकप्रिय आहे. येथे आपण अनेक साहसी क्रियाकलाप करू शकता. तुम्ही बर्फाच्छादित टेकड्यांवर सहलीचा आनंद घेऊ शकता आणि तलावांमधील हाऊस बोट राईडचाही आनंद घेऊ शकता.
 












Edited by - Priya Dixit