रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (08:30 IST)

गौतम बुद्धांचा जीवन परिचय

गौतम बुद्धाचे जन्म ईसा 563 वर्षांपूर्वी कपिलवस्तू ची महाराणी महामायादेवी आपल्या आजोळी देदाह जाताना वाटेतच लुम्बिनी नावाच्या अरण्यात झाला.हे स्थान नेपाळमधील तराई प्रदेशातील कपिलवस्तु आणि देवदह दरम्यान नौतनवा स्टेशनच्या पश्चिमेस 8 मैल दूर रुक्मिणीदेई नावाच्या ठिकाणी आहे. जिथे तिथे लुंबिनी नावाचे अरण्य होते.
त्यांचे नाव सिद्धार्थ ठेवले गेले. त्यांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन होते. जन्माच्या सात दिवसानंतर त्यांच्या आईचे निधन झाले. सिद्धार्थची मावशी गौतमी यांनी त्यांचा सांभाळ केला.
सिद्धार्थने गुरु विश्वामित्रांकडे वेद आणि उपनिषदेच शिकलेच त्यांनी राजकार्य आणि युद्धाचा अभ्यास देखील केला. कुस्ती, घुडदौड, नेमबाजी, रथ हाकण्यात कोणीही त्याच्याशी जुळवणी करू शकत नव्हते. 
त्यांचा मनात लहान पणा पासूनच दयाभाव होता ते कोणाचे ही दुःख बघू शकत नव्हते. त्यांना कोणत्याही प्राण्यांचे दुःख देखील बघवले जात नसे. त्यांचे घोडे थकल्यावर घोड्यांच्या तोंडून पांढरे फेस निघाल्यावर ते घोडयाना विश्रांती मिळावी म्हणून रथ रोखायचे. खेळात हारून जायचे. त्यांना खेळात देखील स्वतःचे हरणे खूप आवडत असे. त्याचे कारण असे की  ते कोणाला दुखी होताना बघू शकत नव्हते.  
 
एकदा सिद्धार्थाला एका शिकारीच्या बाणाने घायाळ झालेला एक हंस सापडला . त्यांना हंसांची ती अशी अवस्था बघून वाईट वाटले. त्यांनी त्याच्या शरीरातून लागलेले बाण काढून त्याला पाणी पाजले आणि कुरवाळले. त्याच क्षणी त्यांचा चुलत भाऊ देवदत्त तिथे आला आणि त्यांना म्हणाला ' की मी या हंसाचा शिकार केला आहे. मला माझा शिकार दे. ' सिद्धार्थने त्याला त्या हंसाला देण्यास नकार दिले आणि म्हणाले' आपण तर या हंसाचे प्राण घेत होता आणि मी त्याचे प्राण वाचविले आहे. आता आपणच सांगा की या हंसावर मारणाऱ्याचा हक्क आहे की त्याचे प्राण वाचविणाऱ्याचा .
देवदत्तने आपल्या वडिलांना घडलेले सांगितले तेव्हा राजा शुद्धोदन म्हणाले 'की सिद्धार्थ आपण हा हंस देवदत्त ला का देतं नाही ? अखेर बाण तर त्यानेच मारले होते. 
या वर सिद्धार्थ म्हणाले की -" पिताश्री आपणच सांगा की आकाशात उडणाऱ्या या मुक्या निरागस पक्ष्यावर बाण सोडण्याचे अधिकार कोणी दिले? या हंसाने देवदत्ताचे काय वाईट केले होते? त्यांनी या मुक्या पक्षीला घायाळ का केले ? माझ्याकडून त्या पक्ष्याचे दुःख बघून वाईट वाटले म्हणून मी त्याच्या शरीरातील बाण काढून त्याचे प्राण वाचविले. म्हणून याच्या वर माझा अधिकार असावा.
 
राजा शुद्धोदन यांना सिद्धार्थचे म्हणणे तंतोतंत पटले. ते म्हणाले की सिद्धार्थ आपण खरे म्हणत आहात मारणाऱ्यापेक्षा जीव वाचविणारा जास्त मोठा आहे.या हंसावर आपलेच अधिकार आहे. 
शाक्य वंशात जन्मल्या सिद्धार्थचे लग्न वयाच्या 16व्या वर्षी दंडपाणी शाक्य कन्या यशोधराशी झाले. राजा शुद्धोधन यांनी सिद्धार्थ यांच्या राहण्यासाठी तीन हंगामात राहण्यासारखे तीन सुदंर आणि भव्य महाल बांधविले. त्यामध्ये सर्व सुख सोयी देण्यात आल्या. करमणुकीचे सर्व साहित्य त्या महालात होते तरीही या सर्व गोष्टी सिद्धार्थला बंधनात अडकवू शकल्या नाहीत. त्यांनी संसाराला  विरक्त होऊन सन्यास घेतले.