शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. जन्मदिवस आणि ज्योतिष
Written By

दैनिक राशीफल 07.09.2018

मेष : अधिक श्रम करावे लागतील. पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. धनाचा व्यय होईल. एखाद्या मित्राशी संबंध अनुकूल वाटेल. 
 
वृषभ : कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्य करताना व वाहन चालवताना सावधान राहा. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा.  
 
मिथुन : आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील. आपणास वरिष्ठ अधिकार्‍यांकडून समर्थन मिळेल. आपणास कला क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. आपणास नवे वाहन मिळण्याची शक्यता आहे. 
 
कर्क : आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. आपला जोडीदार आपणास भावनात्मक पाठबळ देईल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट आपल्यासाठी आनंदाची ठरेल. 
 
सिंह : धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. मान-सन्मानात वाढ होईल.
 
कन्या : आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. मित्रांमध्ये होणारे विवाद आपल्या संबांंसाठी वाईट ठरतील.  मानसिक स्थिती आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्नताचे वातावरण राहील. नवीन संधी मिळतील. 
 
तूळ : आरोग्याची काळजी घ्या. व्यस्तता जास्त राहील. कौटुंबिक विषयांमध्ये धनाचे व्यय होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती मिश्रित राहील.
 
वृश्चिक : इतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांबरोबर किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फळदायी आहे. 
 
धनू : एखाद्या जिवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. 
 
मकर : चांगले भोजन व मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आनंदाची बातमी मिळेल. 
 
कुंभ : काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. 
 
मीन : कार्यात विलंब झालातरी यश मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींनी इतर व्यक्तींची मदत घेऊन कामे करावी. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. बेर्पवाईने वागु नका.