1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. भाजप राष्ट्रीय अधिवेशन
Written By वेबदुनिया|

वसुंधरांची नाराजी कायम?

वसुंधरांची नाराजी कायम
भाजप अधिवेशनात सर्व भाजप नेते एक असल्‍याचे दिसत असले तरीही त्यांच्‍यातील मतभेदाची पुसट रेषा कायम असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसत आहे. भाजपच्‍या वरिष्ठ नेत्‍या आणि राजस्थानच्‍या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे अधिवेशनात न येणे अनेक प्रश्‍न उपस्थित करीत आहे. भाजपने वसुंधरा यांच्‍या मनधरणीची जबाबदारी लोकसभेच्‍या विरोधी पक्ष नेत्‍या सुषमा स्वराज यांच्‍याकडे जबाबदारी सोपविली आहे.

वसुंधरा यांना राजस्थानच्‍या विरोधी पक्ष नेत्‍या पदावरून दूर केल्‍यापासून आणि पक्षाने त्यांचे नव्‍याने पुनर्वसन केलेले नसल्‍याने त्या नाराज आहेत. माजी अध्‍यक्ष राजनाथसिंह आणि अडवाणींशीही त्‍यांचे संबंध बिघडले आहेत. नवे अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही त्यांच्‍या मनधरणीचे प्रयत्‍न केले नाही. कदाचित यामुळे नाराज होऊन वसुंधरा राजे अधिवेशनात गैरहजर आहेत.

या संदर्भात पक्षाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांना विचारले असता, नेते अजून येत असल्‍याने वसुंधरा अजून यायच्‍या आहेत, असे स्‍पष्‍ट केले.

नुकतीच सुषमा यांनी कर्नाटकात मुख्यमंत्री येडीयुरप्पा व रेड्डी बंधुंचया वादावर यशस्वी तोडगा काढून त्‍यांची नाराजी दूर केली असल्‍याने कदाचित हा अनुभव वसुंधरा राजे यांची नाराजी दूर करण्‍यात उपयोगी ठरू शकतो.