शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 9 फेब्रुवारी 2015 (14:35 IST)

आमिर फारच प्रेमळ पिता!

aamir khan
अभिनयाच्या क्षेत्रात मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता  आमिर खान आपल्या व्यस्त दिनक्रमातून कुटुंबियांसाठी वेळ काढतो. त्याचा धाकटा मुलगा आझादला शाळेत सोडायला आणि आणायला स्वत: आमिरच जातो, मात्र त्याला सोडून परत न येता तो तिथेच थांबतो. आता आमिर खानच समोर दिसल्यानंतर चाहत्यांचा गराडा पडणारच! पण तो शांतपणे त्यांच्याशी बोलतो. आझादची शाळा सुटली की, त्याला घेऊन घरी परततो. मोकळ्या वेळात त्याचा हाच दिनक्रम आहे. दंगल या आगामी चित्रपटाचे काम पूर्णपणे सुरू झाल्यानंतर आझादाला वेळ देऊ शकणार नसल्याने सध्या शक्य तितका वेळ तो देतो आहे.