शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By एएनआय|

इमरान नि कतरीना एकत्र

IFM
'धूम' ची सिरीज बनविणारा दिग्दर्शक संजय गढवी आता ' सेव्हन डेज इन पॅरीस' हा चित्रपट बनवतोय. त्यात इमरान खान नि कतरीना कैफ ही जोडी असेल. चित्रपटाचे शुटींग पॅरीसमध्ये केले जाईल. जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या प्रारंभी शुटींग सुरू होईल.

संजय गढवींचा किडनॅप अगदीच फ्लॉप गेला होता. इमरान खानने किडनॅपमध्ये नकारात्मक भूमिका केली होती. पण तो चित्रपट फ्लॉप झाल्याने त्याने नव्या चित्रपटासंदर्भात विचार करायला फार वेळ घेतला. कारण गढवी काही यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखले जात नाहीत. कारण त्यांची धूम सिरीज यशस्वी झाली असली तरी त्यात कलावंत आणि एक्शन डायरेक्टर यांचा मोठा हात होता. त्यामुळे त्यांच्या नव्या चित्रपटाबाबत इमरान साशंक होता. तरीही त्याने होकार भरला आहे. गढवींनी इमरान आणि कतरीना अशी नव्या जुन्याची सांगड घातली आहे. आता कॉलेजबॉय वाटणार्‍या इमरानबरोबर 'हॉट' कतरीना कशी दिसते ते पडद्यावर पहायला नक्कीच मजा येईल नाही का?